Raju Shetti News : राजू शेट्टी यांच्या 'स्वाभिमानी'ला सोबत घेण्याचे चंद्रकांतदादांचे प्रयत्न निष्फळ

Chandrakant Patil & Raju Shetti : भाजपने आमच्या संघटनेची ताकद मोडून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले...
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama

Kolhapur Political News : कधीकाळी भाजप शिवसेना महायुतीचा राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात भाजप यांनी सदाभाऊ खोत यांना बळ दिले. याचदरम्यान, शेट्टी यांनीही आपली वेगळी चूल मांडत भाजपशी काडीमोड घेतला. त्यानंतर राजू शेट्टी हे कायमच भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवत आले आहेत. तसेच काँग्रेस ,राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यातही शेट्टी यांना अपयश आले.

याचवेळी भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्याला शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे चंद्रकांतदादांच्या प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

Raju Shetti
Sarpanch Election : सरपंचाच्या निवडणुकीत ट्विस्ट; शिंदेगावातील दोन ग्रामपंचायत सदस्य अचानकपणे सहलीवर; कुटुंबीयाकडून अपहरणाची तक्रार

चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना महायुतीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून ते प्रतिसादही देतील अशी भूमिका मांडली होती. मात्र, शेट्टी यांनी पाटील यांची ऑफर नाकारली आहे.यावेळी पाटील यांनी भाजप(Bjp)वर सडकून टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, भाजपने आमच्या संघटनेची ताकद मोडून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले, अशा पक्षाबरोबर न जाता आम्ही एकला चलो रे हीच भूमिका ठेवणार आहोत असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अथवा भाजपशी अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. चंद्रकांतदादा आणि माझा अखेरचा संवाद हा नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर असताना घरी आल्यानंतर झाला होता. ही भेट केवळ मित्रत्वाच्या पातळीवर होती. त्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले.

आमची भूमिका एकला चलो रे हीच कायम असून महायुती किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याशी कोणत्याही प्रकारे सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही एकला चलो रे हीच भूमिका कायम ठेवू असेही राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी यावेळी सांगितले.

Raju Shetti
Ambadas Danve News : गद्दार, पन्नास खोक्यांची होळी केल्याने दानवे-म्हस्केंमध्ये जुंपली..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने हे अडचणीत असल्यानेच आणि माने हे सक्षम उमेदवार होऊ शकत नसल्यानेच आपल्याला ऑफर येत असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, चार वर्षे भाजप नेत्यांच्या ओठावर आमची नावे नव्हती, त्यांचा कधी आम्हाला फोन नाही, आम्ही कधी त्यांना फोन केला नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा आता प्रश्नच येत नाही अशी स्पष्ट भूमिकाही शेट्टी यांनी यावेळी मांडली.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय ?

चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत सूचक विधान करत एकच खळबळ उडवून दिली होती. 'रासप' आमच्या सोबत आहे, 'स्वाभिमानी'ही होती. मध्यंतरीच्या काळात ते बाजूला गेले, तरीही राजू शेट्टी यांच्याशी आमचा संवाद असतोच. राजू शेट्टीसोबत येतील, याचा मला विश्वास आहे असं विधान पाटील यांनी केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com