Sarpanch Election : सरपंचाच्या निवडणुकीत ट्विस्ट; शिंदेगावातील दोन ग्रामपंचायत सदस्य अचानकपणे सहलीवर; कुटुंबीयाकडून अपहरणाची तक्रार

‘डाऊ’मुळे चर्चेत आलेलं शिंदेगाव ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी, अपहरणाच्या तक्रारीने गाजतंय
Sarpanch Election
Sarpanch ElectionSarkarnama

आंबेठाण (जि. पुणे) : राजकारण म्हटलं की फुटाफुटी आणि पळवापळवी आलीच. अगदी राज्याच्या विधानसभा सदस्यांपासून ग्रामपंचायत पातळीपर्यंत हे लोण पसरले आहे. असाच प्रकार सध्या शिंदेगाव (ता. खेड) ग्रामपंचायतीत सुरू आहे. याला निमित्त आहे सरपंचपदाच्या निवडणुकीचे. राखीव प्रवर्गातील दोन सदस्य अनपेक्षितपणे सहलीवर गेल्याने सरपंच कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Twist in sarpanch election; Two gram panchayat members from Shindegaon on a trip)

गावच्या राजकीय इतिहासात आजवर दोन गट कायम अस्तित्वात असायचे आणि तोच प्रकार आजही आहे. सुरुवातीच्या काळात राजकीयदृष्टीने संवेदनशील गाव, त्यानंतर डाऊ आंदोलनाने जगाच्या नकाशावर आलेले आणि आता बहुराष्ट्रीय कंपन्या आल्याने शिंदेगाव कायम चर्चेत आहे.

Sarpanch Election
Solapur News : '....म्हणूनच शिंदे-फडणवीस महापालिका, झेडपीच्या निवडणुका घेण्याचे धाडस करत नाहीत'

गावची पंचवार्षिक निवडणूक २०२० मध्ये पार पडली. सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्याने त्यासाठी सुरुवातीला मोठी चुरस होती. त्यात सचिन देवकर यांनी बाजी मारीत सरपंचपद पटकाविले. यात भावकी हा फॅक्टर महत्वाचा ठरला. सचिन देवकर हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याने राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा अंदाज होता. पण, सचिन देवकर यांनीच सर्वसमावेशक काम केले. त्यानंतर आता देवकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने गावातील दुसरा गट सक्रिय झाला आहे. त्यांच्याकडून गावची सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी सरपंच निवड जरी बिनविरोध झाली असली तरी राजकीय बलाबल सहा विरुद्ध तीन असे होते. आता सुरुवातीला निवडणूक शांततेत पार पडेल, असा अनेकांचा कयास होता. परंतु सत्ताधारी गटातील दोन सदस्य अचानक सहलीवर गेले आहेत. त्यामुळे वातावरण तापले आहे.

Sarpanch Election
Sangola Politics : गणपतराव देशमुखांच्या पट्टशिष्याला आमदारकीचे वेध; राष्ट्रवादीच्या साळुंखेंना आशीर्वादासाठी घातले साकडे

दुसरीकडे, ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटुंबीयांकडून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. मात्र, सहलीवर गेलेले सदस्य मात्र आम्ही स्वखुशीने बाहेर आलो असून निवडणूकीच्या दिवशी पुन्हा येणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे गावात चर्चाना उधाण आले असून सगळ्यांचे लक्ष मात्र उद्या (ता. ८ मार्च) होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे.

Sarpanch Election
Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

ही निवडणूक जरी गावची असली तरी तालुका आणि जिल्हा पातळीवरील काही अदृश्य हात हे गावच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या पाठीमागे आहेत, त्यामुळे उद्याचा निकाल काय लागतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com