Maan Maratha News : माणमध्ये गावबंदीचा वणवा; चाळीस गावांनी केली नेत्यांना बंदी

Maratha Reservation सर्वपक्षीय नेत्यांना करण्यात आलेल्या गावबंदीत माण तालुक्याने आघाडी घेतली आहे.
Bidal, tal- Maan Maratha andolan
Bidal, tal- Maan Maratha andolanRupesh Kadam, Dahiwadi
Published on
Updated on

-रूपेश कदम

Maan Political News : मराठा आरक्षणासाठी माण तालुक्यात गावबंदीचा वणवा पेटला असून, १०५ पैकी तब्बल चाळीस गावांत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर काही गावांत साखळी उपोषण सुरू आहे. या संख्येत भरच पडणार असल्याने सणासुदीच्या काळात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation काढण्यात आलेला मोर्चा असो, ठिय्या आंदोलन असो व रात्री अकरा वाजता झालेली ऐतिहासिक सभा असो माण तालुका Maan Taluka नेहमीच आघाडीवर राहिला आहे.

आतासुद्धा सर्वपक्षीय नेत्यांना करण्यात आलेल्या गावबंदीत माण तालुक्याने आघाडी घेतली आहे. १०५ पैकी ४० गावांनी नेत्यांना बंदी केली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत जाणार असून, संपूर्ण तालुक्यात हे लोण पसरणार आहे. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांच्या बोडके तसेच प्रभाकर देशमुख यांच्या लोधवडे या गावांनीसुद्धा सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. बिदाल, कुकुडवाड, दिवड या मोठ्या ग्रामपंचायतींनी हा निर्णय घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. इंजबाव येथे साखळी उपोषण सुरू आहे. Maharashtra Political News

Bidal, tal- Maan Maratha andolan
Manoj Jarange Indefinite Hunger Strike : गावागावांत उपोषण सुरू करा, जीवितास धोका झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार; जरांगे आक्रमक

माण तालुक्यातील नेत्यांना गावबंदी असलेली गावे अशी आहेत. दिवडी, कुकुडवाड, इंजबाव, काळचौंडी, किरकसाल, पुळकोटी, मोही, गोंदवले बुद्रुक, तोंडले, दिवड, भालवडी, खडकी (पाटोळे), वडजल, गोंदवले खुर्द, वरकुटे म्हसवड, उकिर्डे, पांढरवाडी, महिमानगड, हवालदारवाडी, काळचौंडी, खुटबाव, परकंदी (परतवडी), पिंगळी खुर्द, बोडके, कारखेल, कुळकजाई (कळसकरवाडी, गाडेवाडी, खोकडे), देवापूर, लोधवडे, बिदाल, वावरहिरे, वाकी, डंगिरेवाडी, बोथे, सुरुखानवाडी, कोळेवाडी, कासारवाडी, जाशी, भाटकी, मनकर्णवाडी, हिंगणी.

Edited By : Umesh Bambare

Bidal, tal- Maan Maratha andolan
Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com