समरजीत घाटगे जातीयवादी भिडेंच्या मांडीला मांडी लावून कसे बसले? 

आमदार हसन मुश्रीफ व सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांचा स्नेह असल्यामुळेचशासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना2019 -20 मधून दलित वस्तीच्या विकास कामांसाठी तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांचानिधी मंजूर झाला आहे.
समरजीत घाटगे जातीयवादी भिडेंच्या मांडीला मांडी लावून कसे बसले? 
Published on
Updated on

कोल्हापूर : स्वतःला राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस म्हणून डांगोरा पिटणारे समरजित घाटगे जातीयवादी संभाजी भिडे गुरुजी यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसले ? असा सवाल कागलमधील दलित कार्यकर्त्यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. 

कुठे ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्या राजाने दलितांच्या झोपडीत जाऊन चटणी-भाकरी खाल्ली आणि कुठे हे त्यांचे वंशज, जे जातीयवादी संभाजी भिडे गुरुजींच्या मांडीला मांडी लावून बसतात, अशी टीका या पत्रकात केली आहे. 

आमदार हसन मुश्रीफ व सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांचा स्नेह असल्यामुळेच शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2019 -20 मधून दलित वस्तीच्या विकास कामांसाठी तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच या कामांची प्रशासकीय मान्यता मिळून कामे सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु, या कामांना
स्थगिती देण्याची पत्रे समरजीत घाटगे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना दिली आहेत. त्यामुळे दलितांवर अन्याय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच आम्ही दलित आणि बहुजन बांधवांनी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन कोणाच्यातरी सांगण्या वरून होणारा हा दलितांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही,
अशा इशारा दिला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

या पत्रकावर दलित मित्र बळवंतराव माने, कागलचे माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, सुधाकर सोनुले, गणेश सोनुले, संजय हेगडे , रणजित कांबळे, प्रवीण कांबळे आदींच्या सह्या आहेत .  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com