Kolhapur News : कोल्हापूर लोकसभेसाठी निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राजर्षी शाहू महाराज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत असताना या सभेआधीच कोल्हापुरात मोठा धमाका होणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीचे थेट वारसदार माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे हे शनिवारी दुपारी कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये येत आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तपोवन मैदानात महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशिल माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. या सभेस राजवर्धन कदम-बांडे उपस्थितीत राहणार आहेत. (Narendra Modi News)
राजवर्धन कदम-बांडे यांचे धुळे येथून विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर दुपारी आगमन झाले. त्यानंतर आरक्षित वेळ कार्यकर्त्यांच्या भेटीगाटी घेतल्या. त्यानंतर ताराराणी चौकातील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर भवानी मंडपातील आई तुळजाभवानी व श्री अंबाबाई देवीचे दर्शन त्यांनी घेतले.
त्यानंतर शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवन मैदानातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशिल माने यांच्या प्रचार सभेस राजवर्धन कदम-बांडे उपस्थितीत असणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापुरात हात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री राहणार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्रीच कोल्हापूरात दाखल झाले आहेत, त्यांनी या सभेच्या तयारीची पाहणी केली.
(Edited by : Sachin Waghmare)