Sanjay Mandalik News: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची संपत्ती किती? इतक्या कोटींचे कर्ज

Kolhapur loksabha election 2024:खासदार मंडलिक यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसून मंडलिक यांनी आपला व्यवसाय शेतकरी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नी मात्र व्यावसायिक आहेत. गेल्या निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता 9 कोटी 71 लाख 71 हजार रुपये इतकी होती.
Sanjay Mandalik News
Sanjay Mandalik NewsSarkarnama

Kolhapur News: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (Kolhapur loksabha election 2024) उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी पुन्हा एकदा लोकसभेला शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे त्यांनी अर्ज सुपूर्द केला. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आले आहे. जवळपास त्यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 27 हजार इतकी आहे. तर व्यवसायाने शेतकरी असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विवरणपत्र जोडले आहे.

खासदार मंडलिक यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख, 32 हजार 525 असून तसेच 13 कोटी 21 लाख 95 हज़ार 873 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद आहे. खासदार मंडलिक यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसून मंडलिक यांनी आपला व्यवसाय शेतकरी असल्याचे म्हटले आहे.

त्यांच्या पत्नी मात्र व्यावसायिक आहेत. गेल्या निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता 9 कोटी 71 लाख 71 हजार रुपये इतकी होती. ती आता वडीलोपार्जित मालमत्तेसह 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांची मालमत्ता 7 कोटी 61 लाख रुपयांनी वाढली आहे.

खासदार मंडलिक यांच्याकडे वारसाप्राप्त मालमत्ता :

  • ९ कोटी २० लाख ९१ हजार ५२० रुपये

  • ३ कोटी ४१ लाख १८ रुपयांचे कर्ज

  • स्कोड़ा, ऍक्टिव्हा

  • ३५ लाख ९२ हजार ५০০ रुपये किंमतीचे सोने

Sanjay Mandalik News
Madha Lok Sabha 2024: निंबाळकरांच्या नको त्या उठाठेवीमुळे मोहिते पाटील स्वगृही, शरद पवारांना बळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com