Kolhapur Politics : सतेज पाटलांची दोस्तीत कुस्ती! कधीही मुश्रीफांच्या कागलात पाय न ठेवणाऱ्या काँग्रेसने कार्यालय थाटलं

Congress Hasan Mushrif Satej Patil : कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील हसन मुश्रीफ यांची मैत्री सर्वश्रूत आहेत. मात्र, आता दोस्ती कुस्ती होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
Congress leader Satej Patil inaugurates the party’s new office in Hasan Mushrif’s Kagal constituency, sparking political speculation in Kolhapur.
Congress leader Satej Patil inaugurates the party’s new office in Hasan Mushrif’s Kagal constituency, sparking political speculation in Kolhapur.sarkarnama
Published on
Updated on

Congres News : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय अपराजित मैत्री म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, असे म्हटले जाते. लोकसभा, विधानसभा असो किंवा गोकुळ दूध संघाची निवडणूक त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से, राजकीय समन्वय कसा असावा? याचे उदाहरण देणारे आहेत. दोघांच्या मैत्रीबद्दल राज्याला सर्वश्रुत माहिती आहे.

मंत्री मुश्रीफ हे महायुतीत दाखल झाल्यानंतरही त्यांची मैत्री गोकुळची सभेमधून आणखीन बळकट झालेली दिसली. इतकेच नव्हे तर दोघांमध्ये आगामी निवडणुकीतील रणनीती आखण्याच्या हालचाली पडद्यामागून सुरू आहेत की काय असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. त्यामुळे महायुतीतीलच विरोधकांनी थेट मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात मोट बांधायला सुरुवात केली आहे.

विरोधक वाढत असताना मंत्री मुश्रीफ यांच्या मित्रांनी कागल तालुक्यात काँग्रेसने कार्यालय थाटले आहे. थेट काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनीच मंत्री मुश्रीफ यांच्या कागलात संपर्क कार्यालय थाटून काँग्रेसला बळकटीकरण करण्याचे धोरण आखले आहे. यामुळे आगामी राजकीय समीकरणे आणखीन बळकट होणार की बिघडणार? या चर्चेला उधाण आले आहे.

रविवारी कागलमध्ये किसान काँग्रेसच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज विजय झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत राधानगरी, आजरा, शहरात उद्घाटन झाल्यानंतर आता कागल मध्ये काँग्रेसच्या किसान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि एआयसीसीचे सचिव बी एम संदीप, नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कागल येथे पार पडला.

Congress leader Satej Patil inaugurates the party’s new office in Hasan Mushrif’s Kagal constituency, sparking political speculation in Kolhapur.
BJP Politics : सिन्नरमध्ये पुन्हा राजकीय घरफोडी, खासदार राजाभाऊ वाजेंचे काका भाजपच्या गळाला?

वास्तविक लोकसभा निवडणुकीनंतर श्रीमंत शाहू महाराज यांचा विजयी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ठीकठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाची उद्घाटन होत आहेत. हे कारण असले तरी कागलमध्ये काँग्रेसचे कार्यालय सुरू होणे हे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. कारण सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची राजकीय मैत्री कारणीभूत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी पाटील गटाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर 2019 च्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची मैत्री आणखी घट्ट झाली असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ह्या मैत्रीला आणखी बळ मिळाले.

विधानसभा निवडणूक असो वा गोकुळची निवडणुकीत या दोघांच्या मैत्रीतील राजकीय समन्वय संपूर्ण जिल्ह्याने पाहिला. इतकेच नव्हे तर कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकांत देखील बाजी मारली.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीत राहिले. तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विरोधी गटाची भूमिका घेतली. त्यानंतर आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना सोडले तर सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींवर टीका केली. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार एक दिलाने केला. मात्र मंत्री मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात कुठेच दिसले नाहीत. त्याला दोघांची मैत्री कारणीभूत होती.

2024 च्या निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीने सरकार आल्यानंतर महाडिक गटाने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून चांगलेच रान उठवले. या राजकीय गोंधळात देखील मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची गट्टी कायम राहिली. यांच्या राजकीय समन्वयातून मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष राहिले. गोकुळ मधील सभासद वाढीचा मुद्दा असो किंवा डिबेंचरचा मुद्दा? महाडिक गटाने रान उठवल्यानंतर त्याला दोघांनी एक दिलाने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोघांच्या राजकीय समन्वयातून अनेक आव्हाने परतवून लावली आहेत.

दोस्तीत कुस्ती?

आमदार सतेज पाटील यांनीच काँग्रेसच्या जिल्हा किसान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर याच दोस्तीत कुस्ती होण्याची चिन्ह आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कागल मध्ये केलेली एन्ट्री अनेक राजकीय समीकरण निर्माण करणारी आहे. त्याचा पुढील परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.

Congress leader Satej Patil inaugurates the party’s new office in Hasan Mushrif’s Kagal constituency, sparking political speculation in Kolhapur.
NCP (SP) News : धनंजय मुंडेंवर आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांनी हाती घेतली 'तुतारी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com