Kolhapur News: 'गोकुळ'नंतर केडीसी बँकेची चौकशी लावणार; शेतकऱ्यांच्या पैशांवर गब्बर झालेल्यांना इशारा, आमदार शिवाजी पाटील- मुश्रीफ संघर्ष पेटला

Kolhapur District Central Cooperative Bank News: केडीसी बँकेच्या व्यवहारांची चौकशी लावणार आणि शेतकऱ्यांच्या पैशांचा हिशेब घेणार, असा इशारा आमदार शिवाजी पाटील यांनी देत मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार निशाणा साधला.
Kolhapur District Central Cooperative Bank News
Kolhapur District Central Cooperative Bank NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गोकुळ मधील माझे ज्ञान काय आहे, असे माझे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांना राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर टोला लगावला होता. मात्र गोकुळ दूध संघामधील संस्थांची चौकशी लावून त्यामधील संस्था अपात्र केल्या. त्यामुळे गोकुळ मधील माझे ज्ञान काय आहे हे सर्वांना समजले आहे.

गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे कारखाना व आजरा येथील वसंतराव देसाई कारखाना कर्जाच्या खाईत अडकले आहेत, या कारखान्यांना जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा झालेला असताना ते तोट्यात गेले कसे? हा खरा प्रश्न आहे. तर शिवाजीराव पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट इशारा दिला आहे. आमदार पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात महायुतीमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे 'गोकुळ' नंतर आता जिल्हा बँकेचीही चौकशी लावणार, शेतकऱ्यांच्या जीवावर पैसे खाऊन गब्बर होणाऱ्यांची चौकशी लावणार, त्यांची गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला. हेरे सरंजाम प्रश्नाच्या सोडवणुकीबद्दल आज येथे रवळनाथ मंदिराच्या सभागृहात त्यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, 'हेरे सरंजाम प्रश्नात अपुरे कागद हाच अडथळा होता.' माजी आमदार नरसिंगराव पाटील व माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनासुद्धा यश मिळाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माझ्या पाठीशी ठाम असल्यामुळेच हा प्रश्न निकाली काढता आला. तीनवेळा वडील आणि एकदा स्वतः आमदार राहिलेल्या राजेश पाटील यांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा अपयश आले म्हणून थांबलो नाही. कोरोना काळात कुटुंब बाजूला ठेवून समाजासाठी राबलो. तुमच्यासारखे बेळगावमध्ये झोपून राहिलो नाही. त्यामुळेच जनतेने मला उचलून घेतले, असा टोलाही लगावला.

मुश्रीफ, सतेज पाटील यांचे विभागाच्या विकासाकडे दुर्लक्ष आमदार पाटील म्हणाले, 'माझ्या कामाची ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा डंका वाजणार आहे. भडगाव पुलाचे श्रेय खासदार शाहू महाराज यांना जाते. 'गोकुळ'च्या निवडणुकीत सत्तेत राहण्याबरोबरच या विभागाला अध्यक्षपद मिळवून घेणार याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com