Hasan Mushrif : इचलकरंजीत महाविकास आघाडीला धक्का,' ही' आघाडी बाहेर पडून जाणार महायुतीत

Mahavikas Aghadi Setback in Kolhapur : महाविकास आघाडीमध्ये असणारा चाळके गट राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याच्या तयारीत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांनी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक एकत्रपणे लढत अशी बैठक झाली. पण महिनाभरातच इचलकरंजीच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. महाविकास आघाडीमध्ये असणारा चाळके गट राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याच्या तयारीत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मँचेस्टर आघाडी नव्या राजकीय समीकरणाबाबत सुत जुळवण्याच्या तयारीत आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांनी सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात यांचा पक्षप्रवेश होणार असून इचलकरंजी मधील दोन मातब्बर नेते देखील महायुतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

Mahavikas Aghadi
BJP Politics : "मी लायक नसेन..." मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सलग 3 वेळा विजयी झालेल्या भाजप आमदाराने व्यक्त केली खदखद

इचलकरंजी शहरातील राजकीय समीकरणे वेगवेगळी असली तरी पक्षांतर्गत विस्तार अधिक झालेला आहे. त्यासोबतच गटातटाचे राजकारण इथे महत्त्वाचे मानले जात आहे. इतर पक्षासोबत माजी नगरसेवक चाळके यांचा राजकीय गट देखील इचलकरंजीच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा या गटाने प्रचार केला होता.

तर महापालिकेच्या राजकारणात ताराराणी आघाडी सोबत असणारा हा गट आता मँचेस्टर आघाडी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या आघाडीला नवीन वाट शोधून बळ देण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक चाळके यांचा आहे. कोल्हापूर जिल्हा बँक येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Mahavikas Aghadi
Santosh Deshmukh Case : धक्कादायक! 'तुमचाही संतोष देशमुख करू...'; शिंदेंच्या आमदाराच्या पुतण्यांना धमकी, मराठवाड्यात चाललंय तरी काय?

नव्या वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी चाळके गटाचा पक्षप्रवेश निश्चित समजला जातो. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत राहिलेल्या मँचेस्टर आघाडी महायुतीत गेली तर तो महाविकास आघाडीला फटका समजला जातो. इतकेच नव्हे तर अन्य आघाड्याचे मातब्बर नेते महायुतीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com