Kolhapur Politics : कोल्हापुरात DPDC वरून 'राजकीय कुस्ती'

Congress MLA Bycott DPDC Meetin : मुश्रीफ-पाटील यांच्यात तू तू-मै मै, काँग्रेस आमदारांचा जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार
Satej Patil, Hasan Mushrif
Satej Patil, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरून (DPDC) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात शाब्दिक चकमक रंगल्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांनी आजच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून काँग्रेस (Congress) आमदारांना केवळ 10 टक्के निधी दिला जातो, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला होता. निधी कमी मिळत असल्याने विकासकामे कशी करायची, असा सवाल उपस्थित करून सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यासाठी काँग्रेस आमदारांची दखल घ्यावी, अशी मागणी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Satej Patil, Hasan Mushrif
Kolhapur Lok Sabha : एकाच उमेदवारासाठी तीन पक्षांचे दावे, 'सरप्राईज'मध्ये लपलं गूढ

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यातील चार विधानसभेतील, तर दोन विधान परिषद सदस्य आहेत. कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून पी. एन. पाटील आणि हातकणंगलेमधून राजूबाबा आवळे हे विधानसभा आमदार आहेत, तर जयंत पाटील आजगावकर हे शिक्षक आमदार आणि सतेज पाटील विधान परिषद सदस्य आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील या सहा आमदारांना महायुती सरकारमध्ये जिल्हा नियोजन समितीत एकूण निधीच्या केवळ 10 टक्के निधी दिला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना टोला लगावत, 'आम्ही महाविकास आघाडीचे तत्त्व आम्ही पाळत आहोत,' असे स्पष्ट केले होते. त्यावर सतेज पाटील यांनीही मुश्रीफ यांचा समाचार घेत 'महाविकास आघाडीकाळात मुश्रीफ माझ्या शेजारी बसत होते,' असे विधान करून जिल्हा नियोजन समितीला सत्तारूढ समिती असे नाव द्यावे, असा टोला लगावला होता.

या संपूर्ण प्रकारानंतर काँग्रेस आमदारांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. त्याचवेळी निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोपही केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Satej Patil, Hasan Mushrif
Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी घेतले काँग्रेसच्या प्रतापराव भोसलेंचे आशीर्वाद ; काय आहे कारण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com