Kolhapur World Record: कोल्हापूरात घडला विश्वविक्रम! संविधान प्रास्ताविकेचं तब्बल 19 भाषांमध्ये गायन; कसा होता सोहळा?

Kolhapur World Record: या कर्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Kolhapur Preamble Song
Kolhapur Preamble SongSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur World Record: भारतीय राज्यघटना ही प्रत्येक भारतीयाच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत याची झलक आपल्याला पाहायला मिळते. याच प्रस्ताविकेचं भारतातील तब्बल १९ भाषांमध्ये गायन करुन कोल्हापूरात विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. इथल्या ऐतिहासिक दसरा चौकात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये तब्बल १६०० जणांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Kolhapur Preamble Song
Waqf Amendment Act: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सुधारित वक्फ कायद्याच्या तीन तरतुदींना स्थगिती; कोर्टानं नेमकं काय म्हटलंय?

भारतीय संविधान आणि आजच्या लोकशाही दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल सायंकाळी कोल्हापुरात 'हम भारत के लोग' या संविधान गीताचा विश्वविक्रम करण्यात आला. कोल्हापुरातील गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौक इथं झालेल्या या विश्वविक्रमात १६०० जण सहभागी झाले होते.

Kolhapur Preamble Song
Supriya Sule : हैदराबाद गॅजेट'ने कुणाला काय मिळालं? हे मला कुणीतर समजून सांगा : सुप्रिया सुळेंनी प्रश्नात अडकवलं

19 भाषांमध्ये प्रास्ताविकेचं गायन

दरम्यान, मराठी, आसामी, इंग्रजी, संस्कृत, मैथिली, भोजपुरी, ओडिशा, पंजाबी, सिंधी, राजस्थानी, बंगाली, कोकणी, गुजराती, पाली, कन्नड, तेलगू, उर्दू, नेपाळी, हिंदी भाषेत संविधान प्रास्ताविकेचं गायनाद्वारे सादरीकरण झालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com