7474 आणि 9292 : ही दोस्ती तुटायची नाय! 

महादेवराव महाडिक हे आमदार पाटील यांच्या खांद्यावर हात टाकून काही तरी समजावत असल्याचे हे छायाचित्र आहे. हे जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
mahadik- p n patil friendship
mahadik- p n patil friendship

कोल्हापूर : आमदार पी.एन.पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक एकत्रित असलेले छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या गाण्यावर या छायाचित्राचा व्हिडीओ केला आहे. 'गोकूळ'च्या निवडणुकीत ही दोस्ती तुटणार नाही, असे त्याचे संदर्भ पुढे येत आहेत.

महादेवराव महाडिक हे आमदार पाटील यांच्या खांद्यावर हात टाकून काही तरी समजावत असल्याचे हे छायाचित्र आहे. हे जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काहींनी या मिक्‍सिंग व्हिडीओचे व्हॉटस्‌ ऍप 'स्टेटस' सुद्धा ठेवले आहेत. गोकूळ (जिल्हा दूध संघ) ची निवडणूक येऊ घातली आहे. कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे आजपर्यंत गोकूळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सोबतच राहिले आहेत. तसेच इतर निवडणुकीत ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या सोबत असल्याचे दिसून येते.

आमदार पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. यापूर्वी ते 'गोकूळ'मध्ये महादेवराव महाडिक यांच्या सोबत होते. येत्या निवडणुकीत ते कोठे राहणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. राजकरणात कोण कोणाचे दोस्त नसतो आणि कोण कोणाचे शत्रू नसतो, असे म्हटले जाते. त्यामुळे जिल्हा बॅंक, गोकूळ आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही.

नेत्यांचे कट्टर समर्थक सोशल मीडियावरून अनेक मॅसेज व्हायरल करत असतात. त्यापैकीच हा एक मॅसेज आहे. तो मिक्‍सिंग केला आहे. महाडिक यांच्या मोटारींचा क्रमांक 7474 हाच असतो. तर आमदार पाटील यांच्या मोटारींचा क्रमांक 9292 च असतो हे सुद्धा दाखविले आहे. आणि ही दोस्ती तुटायची नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com