Kolhapur Politics : महाडिकांनी पुन्हा सतेज पाटलांना डिवचलं; म्हणाले, त्यांच्याकडे बंगाली बाबा...

Dhananjay Mahadik warns Satej Patil : 'आमचं आम्ही पाहून घेऊ, बाहेरच्याने बोलण्याची गरज नाही...'
Satej Patil, Dhananjay Mahadik
Satej Patil, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या 10 पैकी सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला होता. त्यावर आता भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) कडक प्रतिक्रिया दिली आहे. सतेज पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहे, असा टोला महाडिक यांनी लगावला आहे.

Satej Patil, Dhananjay Mahadik
Kolhapur Politics : 'राजाराम'मधील मारहाणीमुळे कोल्हापुरातील राजकारण तापलं; प्रकरण फडणवीसांच्या कोर्टात

शिंदे गटाच्या सात खासदारांनी (Eknath Shinde) लेखी पत्र देत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केल्याचा मोठा दावा सतेज पाटील केला होता. त्यामुळे राजकारण तापले आहे. त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी आमचा अंतर्गत विषय आम्ही ठरवू, या शब्दात सतेज पाटलांवर पलटवार केला आहे. 'आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहेत. जादूटोणा, ज्योतिष सांगणे हे त्यांनाच जमते. भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल, तर शिवसेना घोषणा करेल. काँग्रेसच्या व्यक्तीने ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी चिंता करू नये. त्यांनी ज्योतिष सांगू नये', असा टोला महाडिक यांनी लगावला आहे.

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरून निधीचा वाद सुरू आहे. 'सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात. ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचाही निधी दिला नाही. त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला, हे दाखवावे', असे थेट आव्हान महाडिक यांनी सतेज पाटलांना दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडेच आहेत. शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेल्या आहेत. 'अबकी बार 400 पार' हा उद्देश ठेवूनच भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे. पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार आहे. मला लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

Satej Patil, Dhananjay Mahadik
Shirdi News: शिर्डीतील काँग्रेसचे शहराध्यक्ष अन् नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; बाळासाहेब थोरात आक्रमक

कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस होता. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते. कालच्या मोर्चात आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. मोर्चात शेतकरी कमी आणि गुंड जास्त होते. एमडी चिटणीस यांना मारहाण करून सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवले. हा एक पूर्वनियोजित गटाचा भाग आहे. हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्याची मागणी करणार, असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

Satej Patil, Dhananjay Mahadik
Maratha Reservation : शिंदेंच्या खासदाराविरोधात मराठा समाजात प्रचंड रोष; दिला उघड इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com