Maratha Reservation : शिंदेंच्या खासदाराविरोधात मराठा समाजात प्रचंड रोष; दिला उघड इशारा

Maratha Reservation Protest Nashik Meeting Leaders Warn Hemant Godse : मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाची तयारी सुरू आहे...
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव-

Maratha Reservation In Maharashtra Latest News : राजकीय स्वार्थासाठी आंदोलनापासून दूर राहणाऱ्या समाजाच्या लोकप्रतिनिधींविरोधात सकल मराठा समाजाने दंड थोपटले आहेत. सातत्याने निमंत्रण देऊनही बाजूला राहणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजाच्या महिला काळे वस्त्र परिधान करून आंदोलन करणार आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवून देण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.

Maratha Reservation
Maratha Reservation : चलो मुंबई... जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार; मराठा समाजाचा नेत्यांना इशारा

मुंबई येथील प्रस्तावीत आंदोलनाच्या तयारीसाठी नाशिक सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाला योग्य ती रसद पुरविण्याची जबाबदारी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने घेतली आहे. पण सुरुवातीपासूनच काही लोकप्रतिनिधी कातडी बचाव धोरण राबवून आंदोलनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. खरेतर, समाजाच्या कामाला निमंत्रणाची गरजच नसते. पण याकडे दुर्लक्ष करीत लोकप्रतिनिधींना मान दिला जातो. तरीही लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. आपल्या सोयीच्या राजकारणासाठी समाजाच्या भावानांशी खेळ करणाऱ्यांना सकल मराठा समाज माफ करणार नाही, असा इशाराच बैठकी दरम्यान देण्यात आला.

याबाबत बोलताना नाना बच्छाव आणि करण गायकर यांनी सांगितले की, निवडणुकीवेळी समाज म्हणून मते मागितली जातात. समाजही त्यादृष्टीने विचार करतो. आज समाजाच्या हिताची मागणी असताना हे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. खासदार लोकसभेत, आमदार विधानसभेत आपली भूमिका मांडत नाही. इतर समाजाचा रोष नको, त्यांची मते फुटायला नको, अशी या लोकप्रतिनिधींची भावना आहे. आता मराठा समाजाचे एकगठ्ठा मतदान अशा लोकप्रतिनिधींनी यापुढे गृहीत धरू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला.

समाजाचे आंदोलन मोठे आहे. या आंदोलनासाठी पैशांची, साधनसामुग्रीची आवश्यकता आहे. कदाचित पैशांच्या धाकाने हे लोकप्रतिनिधी आंदोलनापासून पळ काढत असावेत, असा घणाघात सुनील बागुल यांनी केला. दरम्यान, ५ जानेवारीपासून समाजाकडून तालुका पातळीवर जनजागृती अभियान हाती घेत आहेत. याच कालावधीत सकल मराठा समाजाच्या महिला झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर काळे वस्त्र परिधान करून आंदोलने करतील, असा इशारा बच्छाव यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार गोडसेंवर सर्वाधिक रोष

छगन भुजबळांना विरोध म्हणून दोन वेळा समाज हेमंत गोडसेंच्या बाजूने उभा राहिला. आता समाजाच्या विरोधात भुजबळ असे वातावरण असताना गोडसे पळ काढीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना आम्ही समाज कामासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे. वेळोवेळी लोकप्रतिनिधी पुढे येतात. पण खासदार हेमंत गोडसे नेहमीच मागे राहिले. यापुढे गोडसेंनी मराठा समाजाला गृहीत धरू नये, असा इशारा यावेळी बच्छाव यांच्यासह इतर मराठा समाज बांधवानी दिला.

बैठकीला यांची उपस्थिती

बैठकीला दत्ता गायकवाड, सुनील बागुल, चंद्रकांत बनकर, करण गायकर, नितीन रोटे, वत्सला खैरे, अड. नितीन ठाकरे, योगेश नाटकर, विकी गायधनी, निलेश ठूबे, हिरामण नाना वाघ, कैलास खांडबहाले यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव हजर होते.

edited by sachin fulpagare

Maratha Reservation
Maratha Reservation Issue : ‘जरांगेंनी समजून घ्यावे’; विखे पाटलांनी सरकारची बाजू मांडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com