Kolhapur News, 02 Jul : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.01) चक्काजाम आंदोलन करत शक्तिपीठ विरोधाची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली.
तर दुसरीकडे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी राज्य सरकारलाच चार पर्याय दिले आहेत. शक्तिपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघातून नेण्यासाठी चार पर्यायी मार्ग त्यांनीग सुचवले आहेत.
शिवाय शक्तिपीठ महामार्गामध्ये चंदगड विभागाचा समावेश करावा, अशी मागणी देखील आमदार शिवाजी पाटील यांनी आज रस्ते विकास महामंडळाकडे केली. रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेऊन या मार्गाचा चंदगड मतदारसंघातील जनतेला कसा लाभ होणार याची ‘पीपीटी’द्वारे माहिती दिली.
जिल्ह्यातून या मार्गाला विरोध होत असताना आमदार पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या मार्गामुळे महत्त्वाची देवस्थाने जोडली जाणार आहेत. त्याचा त्या विभागातील विकासाला लाभ होणार आहे.
चंदगड विभागातसुद्धा अनेक प्राचीन मंदिरे, गडकिल्ले आणि नैसर्गिक ठिकाणे आहेत. चंदगड, गडहिंग्लज, आजऱ्याचा विभाग या मार्गावर आल्यास मतदारसंघातील पर्यटन वाढीला चालना मिळून रोजगार, उद्योग वाढणार असल्याचा दावा आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे.
आमदार पाटील यांनी अधिकार्यांपुढे चार मार्गांचा प्रस्ताव ठेवला. यापैकी कोणताही एक मार्ग प्रस्तावित करावा, अशी मागणी करत चंदगड जिल्ह्याचा समावेश करण्याची गरज असल्याचे देखील स्पष्ट केला आहे. पर्यटनाबरोबरच या विभागातील भाजीपाला, पोल्ट्री व्यावसायिक यांनाही लाभ होणार असल्याचे सांगितले.
डॉ. गायकवाड यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाऊ जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी विरोध करीत असताना आमदार पाटील यांच्या भूमिकेला या विभागातील शेतकरी कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.