शरद पवारांनी निवडणूक लढवू नये  : चंद्रकांत पाटील 

दादा, गाडीतली माणसं उद्या बरोबर नसतीलमहाडिक कुटुंबावर टिका करताना रविकिरण इंगवले म्हणाले, कोल्हापूरात एक कुटुंब आहे. त्यांच्यातील माणसं प्रत्येक पक्षात आहेत. दादा त्यांना वेळीच ओळखा. आज तुमच्या गाडीतून फिरणारी माणसं उद्या तुमच्या बरोबर आणि भाजपबरोबर नसतील.
Sharad-Pawar-chandrakant-da
Sharad-Pawar-chandrakant-da

कोल्हापूर : "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यादांच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा विचार करून निवडणूक लढवू नये. माढा आणि बारामती या जागा युतीचेच उमेदवार जिंकतील", असे प्रतिपादन महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी केले. 

निवृत्ती चौकातील शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळा सुशोभिकरणाच्या उद्घाटन सोहळ्यात पाटील यांनी राजकीय टोलेबाजी केली. 

" लोकसभा निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करणार असा प्रश्‍न काही जणांना पडतो. मात्र युतीच्या विजयासाठी मी मैदानात उतरलो आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, माढा, सोलापूर येथील सर्वच जागी युतीचा विजय होईल. महाराष्ट्रातील 48 जागा युतीच्याच असतील," असा दावा  पालकमंत्री पाटील यांनी केला . 

" मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. युतीशी प्रतारणा करणार नाही. युतीच्या विजयासाठी पूर्णक्षमतेने मी मैदानात उतरलो आहे. कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील 48 जागा युतीच्यच असतील. संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी मुरगुडातूनच सुरुवात करणार आहे.''

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमूख (उत्तर)   रविकिरण   इंगवले यांनी केले. ते म्हणाले, "पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास होण्यासाठी महापालिकेत सेना-भाजपचा महापौर होणे आवश्‍यक आहे. लोकसभा, विधानसभा पाठोपाठ महापालिकेत युती होण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि आमदार क्षीरसागर यांनी प्रयत्न केले पाहीजेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com