Smart Light Meter : मीटरचा रिचार्ज संपला की वीज बंद? ठाकरेंच्या नेत्याचा स्मार्ट मीटरवर दावा

Adani Smart Meter Project's : महावितरण वीज कंपनीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाने टीका केली आहे.
Shiv sena On Adani Smart Meter Project's
Shiv sena On Adani Smart Meter Project'ssarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात महावितरण वीज कंपनीकडून जिल्ह्यातील नागरिकांना आणि व्यवसायिक धारिकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहे. मात्र स्थानिक नागरिकांतून याला विरोध वाढत असतानाही स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वा आज (ता.२) शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन महावितरण कार्यालयावर धडक दिली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना दम देत या स्मार्ट मीटरला विरोध केला आहे. सध्या जिल्ह्यात या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधीच स्मार्ट मीटर या प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या वाढत्या विरोधानंतर याची प्रक्रिया सरकारला थांबवावी लागली होती. निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये, याची काळजी घेत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता येताच अदानी प्रोजेक्टच्या स्मार्ट मीटरला गती दिली जात आहे. तशा हालचाली दिसताच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कंदील मोर्चा घेत कोल्हापूर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

राज्य सरकारने स्मार्ट मीटरचे बंधन न करता व्यावसायिक, घरगुती वीजधारकांना पूर्वीप्रमाणेच मीटर द्यावे, अशी विनंती केली होती. तर हे स्मार्ट मीटर रिचार्ज प्रणाली सारखे असून ते संपल्यानंतर काय अशा प्रश्नामुळेच वीजधारकांनी ठिकठिकाणी याला विरोध दाखवला आहे.

Shiv sena On Adani Smart Meter Project's
Balasaheb Thorat On Mahayuti : महायुतीमधील ओढाताणीतून पालकमंत्री ठरेना; बाळासाहेब थोरातांनी राज्यातील गुंडगिरीचे 'वर्णन' एका शब्दात केले

दरम्यान चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाने याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना मोर्चाचे निवेदन दिले होते. तसेच स्मार्ट मीटरचे बसवू नये अशी, विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केल्यानंतर ठाकरे गटाने आपला दणका दाखवला आहे. सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी अधिकाऱ्यांना झापत त्यांची चांगलीच कान उघडणे केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना, पूर्वी कंदील असायचे. त्यामुळे आता देखील आम्हाला कंदील घेण्याची वेळ या राज्य सरकारमुळे आली आहे. यामुळेच हा कंदील मोर्चा काढून आम्ही स्मार्ट मीटरला विरोध केल्याचे देवणे यांनी म्हटले आहे. तर स्मार्ट मीटर असो वा प्रीपेड मीटर असो, हा लोकांना लुटण्याचाच प्रकार आहे. आवळा दाखवून भोपळा देण्याचा प्रकार राज्य सरकारचा सुरू असल्याची टीका देखील देवणे यांनी केली आहे.

Shiv sena On Adani Smart Meter Project's
Uddhav Thackeray: ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का बसणार? फायरब्रँड नेत्यासह माजी आमदार,नगरसेवक साथ सोडणार,कमळ हाती घेणार?

तसेच स्मार्ट मीटरचा रिचार्ज संपला की वीज बंद होणार असा दावा देखील देवणे यांनी केला आहे. तर हे मीटर एकदा त्यांच्या हातात गेले तर 50 युनिट किंवा 100 युनिट वाढवलेलेही कळणार नाही. त्यामुळे अशा स्मार्ट मीटरला आमचा विरोध असल्याचाही विजय देवणे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com