कोल्हापूर : विनायक राऊत हे ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम, त्यांची बॅग तयार ठेवायला लागते, असा गंभीर आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे. दुसऱ्यांचे ऐकून माझ्यावर टीका करत असतील, तर शिवसेना संपवण्याचे कंत्राट विनायक राऊतांनीच घेतलंय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांत सध्या राजकीय कलगीतूरा रंगला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक राऊत म्हणाले होते.
या टीकेनंतर आता राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर पलटवार करत गंभीर आरोप केला. ''विनायक राऊत हे ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असू दे त्यांची बॅग तयार ठेवायला लागते,'' असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी राऊत यांच्यावर केला आहे. दुसऱ्यांचे ऐकून माझ्यावर करत असतील, तर शिवसेना संपवण्याचे कंत्राट विनायक राऊत यांनी घेतल्याचे ते म्हणाले.
दोन्ही खासदार शिंदेगटात जाणार....
राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदारांवरून ही मोठा दावा केला आहे. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने लवकरच बंडखोर शिंदे गटात दिसतील, असा दावा केला आहे. काल झालेल्या शिवसेना मेळाव्याला हे दोन्ही खासदार अनुपस्थित होते. संजय मंडलिक यांनी दिल्लीत असल्याचे सांगितले होते. धैर्यशील माने तब्येत बरी नसल्याने उपस्थित नव्हते.
सतेज पाटील यांचा खुलासा...
श्री. राऊत व क्षीरसागर यांच्यातील टीकेवरून माजी मंत्री सतेज पाटील यांनी खुलासा करताना सांगितले की, हा राजकीय आरोप असू शकेल, पण तस काही नाही. त्यांनी घरी जेवायला बोलावलं होतं. नाना पटोले आणि राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात एकत्र काम केलं आहे, त्यामुळे राजेश क्षीरसागर यांनीच सांगितलं होतं.
नाना पटोले यांना जेवण्यासाठी घरी बोलावलं आहे, तुम्हीही या असं सांगितलं होत. त्यामुळे तसा काही विषय नाही. त्यांच्या घरचा जेवणाचे बिल मी द्यायचा काही संबंध नाही. एवढ्या खाली टीका संयुक्तिक टीका बरोबर नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असू शकतो. तस असतं तर मी माझ्या घरी जेवणं दिलं असतं तसा काही विषय नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.