गोपीकिशन बाजोरियांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, घरभेदींमुळे झाला पराभव..

ज्यांनी पराभवासाठी प्रयत्न केले त्यांची नावे मुख्यमंत्र्यांकडे (Chief Minister) गेली असून, खासदार अरविंद सावंत यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचे गोपीकिशन बाजोरिया (Gopikisha Bajoriya) यांनी सांगितले.
Gopikishan Bajoriya
Gopikishan BajoriyaSarkarnama
Published on
Updated on

अकोला : विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात घरभेदींमुळे पराभव झाला असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoriya) यांनी केला आहे. या प्रकरणाची खुद्द मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) दखल घेतली असून, लवकरच पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होईल, अशी अपेक्षाही बाजोरिया यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या अकोला (Akola) बुलडाणा वाशीम स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाल्यानंतर चौथ्या वेळेस बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवाच्या तब्बल एका महिन्यानंतर एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना बाजोरिया यांनी अकोला आणि बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील स्वपक्षीयांवर निशाणा साधला. पक्षातीलच काही लोकांनी माझ्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा आरोप बाजोरिया यांनी केला आहे. या पराभवाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. तब्बल महिनाभरानंतर स्वपक्षीयांवर बाजोरिया यांनी पराभवाचे खापर फोडून खळबळ उडवून दिली आहे. त्यांचा नेमका रोष कोणावर होता हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. ज्यांनी पराभवासाठी प्रयत्न केले त्यांची नावे मुख्यमंत्र्यांकडे गेली असून, यासंदर्भात खासदार अरविंद सावंत यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचे गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितले.

शिवसेनेतील मतभेद येणार चव्हाट्यावर..

अकोला जिल्ह्यात शिवसेनेमध्ये माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांचे दोन गट पडले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. बाजोरिया यांच्या आरोपांनी आजी-माजी आमदारांमध्ये मतभेदाची दरी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

Gopikishan Bajoriya
अकोला पूर्वमध्ये काँग्रेसची पाटी कोरी; नेत्यांचीच निवडणुकीकडे पाठ...

बाजोरिया एकाकी पडण्याची शक्यता..

शिवसेनेतील गटबाजीनंतर व विधान परिषदेतील गोपीकिशन बाजोरिया यांच्या पराभवानंतर त्यांच्या आजूबाजूला फिरणारे शिवसैनिक सध्या गायब झालेले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे ते पक्षात आता एकाकी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Amruta Fadnavis
Pratibha Dhanorkar at BJP Dahi Handi Event
Prataprao Jadhav Vidyadhar Mahale
Sanjay Gaikwad Vs Shweta Mahale .jpg
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com