Beed News, 27 Oct : बीड (Beed) जिल्ह्यातील भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी शनिवारी (ता26) राजीनामे दिले. परळी वैजनाथ येथील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पंकजा मुंडे यांचे समर्थक राजेश देशमुख यांनी आपल्या पदाचा व भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
आमच्या नेत्यांना पक्षात विचारले जात नसेल तर आमचे भवितव्य काय? असा सवाल करत राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी राजीनामा दिला. तर याआधी भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून मतदारसंघामध्ये सतत होणाऱ्या हस्तक्षेपामुळे मतदारसंघातील विकास कामांवर परिणाम झाला. तसेच भारतीय जनता पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत गेला.
पालकमंत्र्यांनी स्वतःचा मनमाणी कारभार चालवण्यासाठी मर्जीतील अधिकारी मतदारसंघात आणून बसवले. हे अधिकारी अवैध धंद्यांना अभय देवू लागले, भ्रष्टाचार करू लागले त्याचा सामान्य माणसांना त्रास होवू लागला आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण पवार यांनी केला.
या सर्व गोष्टींची वारंवार पक्ष श्रेष्ठीकडे तक्रार करून देखील कुठलीच दखल न घेतल्यामुळे राजीनामा देत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं. तर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि वैद्यनाथ देवस्थान समितीचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भारतीय जनता पक्ष (BJP) दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वाढवला. त्यांचा वारसा पंकजा मुंडे सक्षमपणे चालवत आहेत. त्यांच्या कामाकडे पाहूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी मला सन्मानाने वागवले, डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला, निवडून आणले. पण आमच्या नेत्यांनाच गेले काही वर्षे पक्षाने बायपास केल्याचं देशमुख म्हणाले.
आमच्या नेत्यांना पक्षात किंमत दिली जात नसेल तर आमचे काय यामुळे मी पक्षाच्या सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मी आज ईमेल द्वारे पाठवला आहे.
मी पुरोगामी विचारांचा असून शरद पवार यांना तीन वेळा भेटलो तसेच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनाही दोन वेळा भेटलो आहे. शरद पवारांना मतदारसंघाची सर्व परिस्थिती सांगितली असून त्यांनी मतदारसंघात नक्कीच बदल करु असे सांगत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. असंही राजेश देशमुख यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.