

Pune : पुढील वर्षी लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान,भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. यात आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे सर्वाधिक बॅनर लागलेलं पाहायला मिळाले आहेत. याचवेळी आता भाजपच्या बड्या नेत्यानं आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे १० दावेदार असल्याचं विधान करुन ठिणगी टाकली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे एकूण १० जण दावेदार आहेत. २०२४ पर्यंत यामध्ये आणखी दोन नेत्यांचा समावेश होईल. त्यामुळे दहा मुख्यमंत्री असलेली ही पार्टी आहे असा खोचक टोलाही बावनकुळे यांनी आघाडीला(Mahavikas Aaghadi) लगावला.
मुख्यमंत्री होण्यासाठी विठूरायाकडे...
काही लोक मुख्यमंत्री होण्यासाठी विठूरायाकडे जात असतात. महाविकास आघाडीमध्ये दहाजण मुख्यमंत्री(Chief Minister) पदाचे दावेदार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे तीन नेते भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात. यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री म्हणून फोटो लावतात. इकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून फोटो लावतात.
त्यामुळे मुख्यमंत्री बनण्यासाठी कोण-कोण विठूरायाकडे गेलं होतं, हे मला माहीत नाही. पण आम्ही महाराष्ट्राला समृद्धी येऊ दे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारला एवढं बळ मिळू दे की, ते महाराष्ट्राला पहिल्या क्रमाकांवर आणतील असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
एनडीए 2024 मध्ये 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार...
भाजप आणि मोदी यांच्याविरोधात देशातील विरोधी पक्ष पाटण्यात एकत्र आले होते. यावरुन बावनकुळेंनी टीकेची झोड उठवतानाच मोठा दावा केला आहे. बावनकुळे म्हणाले, "भाजप विरोधात विरोधक पाटण्यात एकत्र आले असले तरी ही विरोधकांची वज्रमूठ सैल करण्याचं काम 140 कोटी जनता करेल. तसेच विरोधकांनी आज एकत्र येऊन मूठ बांधली असली तरी देशाची जनता ओळखून आहे. मला वाटतं 2024 मध्ये संपूर्ण एनडीए 400 पेक्षा जास्त जागांवर यश मिळवेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.