Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार? सुनावणीची तारीख ठरली

Maratha Reservation Mumbai High Court Hearing : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्या वतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे. मात्र, आयोगाचे वकील परदेशात आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservation sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. हिंगोलीतून शांतता रॅली सुरू करून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आज (बुधवारी) जरांगे पाटील यांची धाराशिवमध्ये शांतता रॅली सुरू असताना मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वाची बातमी आली आहे.

सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार की नाही, याचा फैसला पाच ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

मराठा आरक्षणाला Maratha Reservation विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्या वतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे. मात्र, आयोगाचे वकील परदेशात असल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी हायकोर्टाने मंजूर करत तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी पाच ऑगस्टला होणार आहे.

Maratha Reservation
Video BJP Politics : भाजपचा देवेंद्र फडणवीसांवर भरोसा नाय का? एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभा...

नियमित सुनावणी

पाच ऑगस्टपासून आरक्षणावर नियमित सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण टिकणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले स्वतंत्र आरक्षण हे हायकोर्टात टिकले होते.मात्र, सुप्रीम कोर्टात रद्द करण्यात आले होते.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

मराठा समाजाला ओबीसी OBC समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी ओबीसी संघटनांची मागणी आहे. तर, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. जर राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकले तर सरकारचे सर्वच प्रश्न सुटतील. मात्र, जर हे आरक्षण टिकले नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अधिक धारधार होईल.

Maratha Reservation
Nagpur Collector and Voting Percent : लोकसभेवेळी मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभेसाठी नागपूरचे जिल्हाधिकारी 'मिशन मोड'वर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com