Video BJP Politics : भाजपचा देवेंद्र फडणवीसांवर भरोसा नाय का? एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभा...

Assembly Election Devendra Fadnavis Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून 100 जागांची मागणी करण्यात येत आहे. मात्र, शिंदे गटाला 100 जागा देण्यास भाजप स्थानिक नेत्यांचा विरोध आहे.
 Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मोकळं करा, अशी मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीची तयारी करायची असल्याचे कारण फडणवीसांनी पुढे केले होते. भाजप वरिष्ठांनी त्यांची समजूत काढली. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढाव्यात का? याची चाचपणी भाजप वरिष्ठ नेतृत्व करत आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली तर पुन्हा शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यासंदर्भात नेत्यांची मते जाणून घेतल्याची चर्चा आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत Loksabha Election शिंदे गटाने चांगली कामगिरी केली. 15 जागा लढवत त्यांनी सात जागांवर विजय मिळवला. भाजपपेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

 Devendra Fadnavis Eknath Shinde
Jayant Patil News : '..हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे' ; जयंत पाटील यांनी केला आरोप!

भाजप नेत्यांचा विरोध

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून 100 जागांची मागणी करण्यात येत आहे. मात्र, शिंदे गटाला 100 जागा देण्यास भाजप स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. तसेच फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांच्या मते शिंदे यांच्या नेतृ्त्वापेक्षा सामुहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढायला हवी.

देवेंद्र फडणवीसांची कोंडी ?

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी लोकसभा निकालानंतर राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यांचा राजीनामा भाजप वरिष्ठ नेतृत्वाने स्वीकारला नाही. दिल्लीत बैठक घेत महत्वाच्या सूचना करत सामुहिक नेतृत्व स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. तसेच आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याच्या चर्चा करून देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली जात असल्याचे चित्र आहे.

 Devendra Fadnavis Eknath Shinde
Radhakrishna Vikhe Patil : 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा'; मंत्री विखेंचे बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनी लाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेश !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com