Satara News : गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. आपल्या नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना अक्षरश:वेड लावले आहे. राज्यात विविध ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर निमित्तानं गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. आता भाजप आमदाराच्या वाढदिवसानिमित्तही चक्क गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोकांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे आमदार शिवेंद्रराजेंनीही काही वेळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, त्यानंतर ते कामानिमित्त कार्यक्रमातून बाहेर पडले. कार्यकर्त्यांनी मात्र, अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली.
आपल्या लावणी आणि सौंदर्यानं सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील मागील काही महिन्यांपासून (Gautami Patil)चांगलीच चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी होत देखील झालेली पाहायला मिळालेली आहे. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी, हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता. मात्र, यामुळे गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा येथे एका पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. नुकताच एका भाजप आमदाराच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समोर आले आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तंबी...
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाविषयी मोठं विधान करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तंबीही दिली होती. पवार म्हणाले होते की, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. महाराष्ट्राची काही परंपरा आहे. लावणी असो वा इतरते कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये.
काही जिल्ह्यात बंदी आहे पण काही जिल्ह्यात ते चालू आहे. तर ते नक्की काय आहे, याबद्दल संबंधितांशी बोलणार आहे. असा प्रकार महाराष्ट्रात घडता कामा नये. कुणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित न करण्याचेच आदेश दिले. इतकंच नाही, तर त्यांनी अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.