"Santoh Deshmukh यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत..."; सुरेश धस यांची आगळीवेगळी प्रतिज्ञा

BJP MLA Suresh Dhas Vows Not to Accept Any Honors Until Justice for Santosh Deshmukh दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नाही, अशी आगळीवेगळी प्रतिज्ञा भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
Suresh Dhas  Santosh Deshmukh
Suresh Dhas Santosh Deshmukh sarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh News : दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नाही, अशी आगळीवेगळी प्रतिज्ञा भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. ते धाराशिवमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

मंत्री जयकुमार गोरे यांची भाजपने (BJP) धाराशिव जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोरे यांचा सत्कार आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी धस यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांनी ही प्रतिज्ञा केली असल्याचे सांगितले.

Suresh Dhas  Santosh Deshmukh
Shivsena Politics : 'नीलम गोऱ्हेंकडे महागड्या साड्या, सोन्याचा नेकलेस मग...', ठाकरेंच्या वाघिणीचे चोख प्रत्युत्तर

धस यांची मस्साजोगला भेट :

सुरेश धस यांनी शनिवारी मस्साजोगला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट दिली. तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना धस यांनी राज्य सरकारकडे आठ प्रमुख मागण्या केल्या.

बीड जिल्ह्यात केवळ अधिक्षक बदलून उपयोग नाही, अतिरिक्त अधिक्षक म्हणून पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी धस यांनी केली. यावेळी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला मिळणाऱ्या तुरुंगातील व्हीआयपी ट्रिटमेंवरही त्यांनी भाष्य केले. वाल्मिक कराडला चहा कोण आणून देते? जेवण कोण आणून देते? काही लोकांना मटण-चिकन कसे पोहोचते? असा सवाल केला.

Suresh Dhas  Santosh Deshmukh
Neelam Gorhe : "शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं..." नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

संतोष देशमुख यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यावर शासकीय रूग्णालय केजकडे नेणे अपेक्षित होते. मात्र उप निरीक्षक राजेश पाटील यांनी कळंबकडे नेले. ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवली. पोलीस अधिकारी महाजन यांची बीड येथे नियुक्ती आहे त्यांचे कामकाज केज पोलीस ठाण्यात कसे काय चालते? असे तिखट सवाल करत या दोघांना सस्पेंड करून सहआरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दहाव्या आरोपीचाही सहभाग आहे. नितिन बिक्कड यानेच धनंजय मुंडे यांच्या घरी बैठक बसवली होती. त्यानेच वाशीमधून आरोपींना पळून जाण्यास मदत केली होती. त्यामुळे नितिन बिक्कड यालाही सहआरोपी करावे, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यात यावी. दिलीप गीते, गोरख फड आणि दत्ता बिकड यांनाही सहआरोपी करा, या सर्वांचे सीडीआर तपासले जावे, अशा मागण्या धस यांनी केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com