उपोषणकर्त्या ६ विद्यार्थ्यांची राज्यभरात हवा! 'आदिवासी योद्धा' म्हणून होतोय सन्मान

Tribal 6 students hunger strike: आपल्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या ६ विद्यार्थ्यांचा ‘आदिवासी योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा होत आहे.
Tribal 6 students hunger strike
Tribal 6 students hunger strikeSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क आणि विविध मागण्यांसाठी केवळ सहा विद्यार्थ्यांनी तब्बल सतरा दिवसांचे उपोषण केले. अनेक चर्चा आणि बैठका होऊनही न झुकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत अखेर सरकारला झुकायला लावून मोठे यश मिळविले आहे. त्यांच्या या योद्धा वृत्तीचे हजारो आदिवासी विद्यार्थी व समाजासह राज्यभरातून कौतुक होत आहे.

या विद्यार्थ्यांनी वस्तीगृह व आश्रम शाळेच्या संदर्भातील आपले सुमारे चाळीस छोटे-मोठे प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती. गेली सतरा दिवस मोठ्या विश्वासाने आणि आपल्या मागण्यांवर ठाम राहत मांजरी स्टड फार्म येथील वस्तीगृहा समोर उपोषण केले. सुरुवातीला सरकारने या उपोषणाकडे सहजतेने पाहत अधिकारी पातळीवर हे उपोषण व आंदोलन हताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत सरकार पातळीवर त्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा कायम ठेवला. अखेर सतराव्या दिवशी (ता. २९) सरकारने विद्यार्थी समन्वय समितीशी चर्चा करून दोन मागण्यांच्या शासन निर्णयासह इतर मागण्याही निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.

Tribal 6 students hunger strike
सरकारचा मोठा निर्णय! आता देशातील सर्व व्यवहारांसाठी एकच वेळ

उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांसह दोन विद्यार्थिनींचा समावेश होता. या सतरा दिवसांच्या कालावधीत खालावलेल्या प्रकृतीमुळे या सर्वांना वेळोवेळी रुग्णालयातही दाखल व्हावे लागले होते. असे असतानाही ते खचले नाहीत. राज्यभरातील आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

अमरण उपोषणाला बसलेल्या या विद्यार्थ्यांमधील श्वेता विलास इरणक ही अर्थशास्त्राच्या पदव्युत्तर दुसऱ्या वर्षासाठी शिकत आहे. गेली चार वर्षापासून ती वस्तीगृहात राहते. निरगुडवाडी, ता. अकोले जिल्हा अहिल्यानगर येथून आलेल्या या उपोषणकर्तीला एक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निकिता अरूण मेचकर ही मुळची भीमाशंकर जवळील तळेघर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील असून राज्यशास्त्र विषय घेऊन पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आंदोलनादरम्यान तीला तीन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शरद खेमा ठोकळ, हा विद्यार्थी एम. ए. करत आहे . तो मूळचा नायफड, ता. खेड, जि. पुणे येथील असून गेली चार वर्ष पासून वसतिगृहात राहत आहे. त्याला एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजाराम दिलवरसिंग पाडवी, तो नंदुरबार जिल्ह्यातील असून विज्ञान विषय घेऊन दुसऱ्या वर्षात शिकत आहे. गेली दोन वर्षापासून तो वस्तीगृहात असून त्याला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विजय रमेश बांबळेविजय रमेश बांबळे हा विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील असून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. गेली वर्षभरापासून तो वसतीगृहात राहत आहे. त्याला चारवेळा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुल ग्यानबा धनवे हा विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निमटोक गावातून आला आहे. तो बीएससी नर्सिंग मध्ये शिक्षण घेत असून गेली वर्षभरापासून वसतीगृहात राहत आहे. आंदोलनादरम्यान त्याला चारवेळा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Tribal 6 students hunger strike
NEET Student Fine : 'नीट'मध्ये 160 गुण अन् दावा 680 गुणांचा; याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थिनीला न्यायालयाची चपराक, ठोकला 25 हजार रुपयांचा दंड!

"शिस्त, संयम आणि संविधानामुळे तसेच राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रेरणेतून हा लढा शक्य झाला. हा लढा हक्क आणि शिक्षणासाठी होता. अन्याय विरोधात होता. अजूनही हा लढा थांबलेला नाही. राहिलेल्या मागण्यांसाठी तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे. या काळात योग्य अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा लढा उभारला जाईल," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संपूर्ण आंदोलनादरम्यान इतर विद्यार्थ्यांकडून तसेच भेट देण्यास येणाऱ्या मान्यवरांकडून या सहाही विद्यार्थ्यांचा उल्लेख आदीवासी योध्दा असा केला जात होता. त्यांचे उपोषण सोडण्यासाठी आलेले आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनीही तसा उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्यभरातून या विद्यार्थ्यांचे योद्धा म्हणून कौतुक होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com