Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली.
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना या समितीनिमित्ताने भाजपने त्यांना पुन्हा मुख्य राजकारणात सहभागी करून घेतलं आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांना विधानसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी देत भाजपने त्यांना पुन्हा अॅक्टीव्ह केलं. किरीट सोमय्या 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला पुरतं घायाळ केलं होतं. विविध घोटाळे काढून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना आरोपांच्या फैरी करत चांगलच अडचणी आणलं होते. शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याशी निगडीत रिसॉर्टसंदर्भात केलेल्या जमीन घोटाळा आरोप विशेष गाजला.
परंतु गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या भाजपमध्ये (BJP) असून बाजूला होते. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत ते अधिक सक्रिय नव्हते. विरोधकांनी त्यांना घेरलं होते. त्यांच्या काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं, ते काहीसे बाजूला फेकले गेले होते. भाजपने देखील काहीकाळ त्यांच्या दुर्लक्ष केलं होते. यावेळची विधानसभा निवडणूक वेगळ्या पातळीवर लढली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला बसलेला फटका लक्षात घेऊन, भाजप पक्षानं वेगवेगळ्या पातळीवर विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. यातच किरीट सोमय्या यांना देखील अॅक्टीव्ह केलं आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीला राज्यात 160 जागा लढवण्याचं निश्चित केल्याचं दिसतं. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दौऱ्यात तशी चर्चा झाल्याचं बोलले जात आहे. यातच महायुतीला विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळणार, याचे सर्व्हे समोर आल्यानं भाजप अधिक सावध झालं आहे. यातून भाजपने जुने-जाणत्या कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून अॅक्टीव्ह करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या म्हटलं की भाजपची तोफ! त्यामुळे त्यांच्यावर भाजपने पुन्हा विश्वास दाखवत, विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
रावसाहेब दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्याबरोबरच विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.