Mumbai News : राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मावर मोठं विधान केलं आहे. धर्मावर बोलताना ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’, हे सांगणे म्हणजे धर्म नाही. हिंदू धर्म हा सर्वांना एकत्र आणणारा उदात्त विशेषण आहे, असं भागवत यांनी म्हटलं. यावर खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना उपरोधिकपणे कधी बोलायचे, याचा सल्ला दिलाय.
"हिंदू धर्माविषयी त्यांची भूमिका बरोबर आहे. परंतु देशामध्ये खाण्यावरून, पिण्यावरून झुंडशाही आणि 'मॉब लिंचिंग' सुरू होतं, त्यावेळी मोहन भागवत बोलले असते, तर आम्ही त्यांच्या पायाला हात लावला असता", असा उपरोधिक टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत सकाळी माध्यमाशी संवाद साधत होते. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक (RSS) मोहन भागवत यांनी हिंदू धर्मावरून केलेल्या भाष्यावर लक्ष वेधण्यात आले. मोहन भागवत यांनी हिंदू धर्म सर्वांना एकत्र आणणारा उदात्त विशेषण आहे, असं सांगितलं. याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधल्यावर त्यांनी मोहन भागवत यांना उपरोधिक टोला लगावला.
संजय राऊत (Shiv Sena) म्हणाले, "मोहन भागवत जे काही म्हणाले, ते खरं आहे. परंतु जेव्हा राज्यात, देशांमध्ये खाण्यावरून, पिण्यावरून झुंडशाही आणि मॉब लिंचिंग सुरू होतं, तेव्हा मोहन भागवत बोलले असते, तर आम्ही त्यांच्या पायाला हात लावला असता". मॉब ब्लिचिंगमध्ये ठाण्यात, देशात जे बळी गेले, खुलेआम माणसे गेले, तेव्हा भागवत बोलले असते, तर नक्कीच आम्ही त्यांचा गौरव केला असता. पण ते आता बरोबर बोलत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्याच्या वादात काही अर्थ नाही, असे सांगत लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले समकालीन होते. दोघांनीही त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमांतून ज्या भूमिका घेतल्या, महात्मा फुले असतील किंवा टिळक असतील, या वादात पडण्याचं कारण नाही. छत्रपती आमचं दैवत आहे आणि समाधी रायगडावर आहे, त्याचं स्मरण आणि निगा आपण राखली पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.