मुंबईत सोमवारी गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात विमानतळावर चर्चा झाली. तेव्हा, अजितदादा पवार यांनी गृहमंत्री शाह यांच्यापुढे 'बिहार पॅटर्न'प्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपद ठरवा, असं प्रस्ताव मांडल्याचं वृत्त एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावरून राजकीच चर्चा रंगली होती. यावर अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही," असं स्पष्टीकरण अजितदादा पवार यांनी दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) रविवारी आणि सोमवार, असे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. सोमवारी दिल्लीला परत जाताना गृहमंत्री शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गृहमंत्री शाह यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला.
"निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा. महाराष्ट्रात 'बिहार पॅटर्न' राबवा," अशा मागणीचा प्रस्ताव अजितदादांनी ( Ajit Pawar ) गृहमंत्री शाह यांच्यासमोर ठेवला आहे. याबाबत 'द हिंदू'नं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं होतं. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र, हे वृत्त फेटाळत अजितदादा पवार यांनी चर्चांना रोख लावला आहे. अजितदादा म्हणाले, "मुख्यमंत्रिदाबाबत अमित शाह यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. राज्यात कापूस, सोयाबीन, कांदा निर्यातबंदी, 'एमएसपी'चा दर आणि अन्य काही गोष्टींबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली."
महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते का? असा प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी सांगितलं, "असं काहीही होणार नाही. सगळ्या थापा आहेत. सगळेजण बसून 288 जागा कुठल्या-कुठल्या पक्षाला देण्यात येतील, हे ठरणार आहे. बऱ्याच जागांवर चर्चा झाली आहे. अजून काही जागांबाबत चर्चा राहिली आहे. जेव्हा, आमचं अंतिम ठरेल, तेव्हा याची माहिती देण्यात येईल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.