MVA News : महाविकास आघाडीत आंबेडकरांवरुन वादाची ठिणगी? राऊत- पटोलेंच्या वक्तव्यानं संशयांचं धुकं वाढलं

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटाशी युती, तिचा महाविकास आघाडीशी संबंध नाही....
Sanjay Raut, Prakash Ambedkar, Nana Patole
Sanjay Raut, Prakash Ambedkar, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole Vs Sanjay Raut : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीच्या दिवशीच राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. मात्र,याचवेळी आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्यासाठी उध्दव ठाकरे हे आग्रही असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाशी युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी(MVA) काहीही संबंध नसल्याचं विधान केलं आहे. यामुळे आंबेडकरांच्या सहभागावरुन महाविकास आघाडीती वाद चव्हाट्यावर आला आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुवातीला सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपसोबत आहे हे विधान आणि आमची युती ठाकरेंशी असून मला महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा नाही असं विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. नाना पटोले यांच्या स्पष्टोक्तीमुळे आघाडीतील नेत्यांमध्ये आंबेडकरांच्या मविआमधील सहभागावरुन धूसफूस असल्याचं समोर आलं आहे.

Sanjay Raut, Prakash Ambedkar, Nana Patole
BJP MLA Suresh Dhas : सुरेश धस यांनी देवस्थानची जमीन हडपली? सामाजिक कार्यकर्त्याचे कारवाईसाठी बेमुदत उपोषण सुरु

काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गोंदियात माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर आणि ठाकरे युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नाही असं विधान केलं आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही हे स्पष्ट केलं आहे. तसेच देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीचा भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार (Sharad Pawar)यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे. मतभेद असले तरी त्यांच्याविषयी बोलताना आदर ठेवून बोललं पाहिजे असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. याचवेळी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे घटक होतील अशी अपेक्षाही राऊतांनी व्यक्त केली होती.

Sanjay Raut, Prakash Ambedkar, Nana Patole
Maharashtra Politics: ''...म्हणून शरद पवारांबद्दल बोलताना आदर ठेवून बोललं पाहिजे!''; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे २०१९ रोजीचा राज्यातील भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले, पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो. जे लोक पहाटेच्या सत्तेत होते त्यांनाच विचारा. महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनाच हा प्रश्न विचारा. मात्र, राज्यातील सध्याचं सरकार हे असंवैधानिक असून, राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण पत्रच दिले नसल्याची बाब समोर आली असल्याचा पुनरुच्चार पटोलेंनी केला आहे.

राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पटोले आणि पटेल यांच्यातील वाद असून तो नेहमी सुरू राहावा असं विधान केलं होतं. यावरुन मुनगंटीवारांना टीकेची झोड उठवितानाच गोंदियाच्या पालकमंत्र्यांनी काय बोलावे, हे मला त्यांना सांगावं असं वाटत नाही. सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळं सत्तेचा माज त्यांना आला आहे असंही पटोले यावेळी म्हणाले.

कसबा पोटनिवडणूक लढवणार

महाविकास आघाडीची कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणुकी संदर्भात दोन तारखेला अधिकृत बैठक होणार आहे. कुठली जागा कोण लढणार याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. चर्चा करून अंतिम निर्णय केला जाणार आहे. तसेच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. त्यावरून पटोले यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com