BJP MLA Suresh Dhas : सुरेश धस यांनी देवस्थानची जमीन हडपली? सामाजिक कार्यकर्त्याचे कारवाईसाठी बेमुदत उपोषण सुरु

न्यायालयाने आदेश देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
BJP MLA Suresh Dhas
BJP MLA Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Beed News: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात मुंबईत आमरण उपोषण सुरु केल आहे. तालुक्यातील कथित हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरणाप्रकरणी धस यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशई मागणी खाडे यांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरुच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

BJP MLA Suresh Dhas
Nashik Graduate Constituency: पदवीधरमध्ये नवा ट्विस्ट; नाशिकमध्ये शुभांगी पाटलांना वंचितचे आव्हान..

काय आहे प्रकरण ?

हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणाबाबत गेल्या तीन वर्षांपासून मी लढा देत होतो. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. १८ ऑक्टोबर न्यायालयाने रोजी राम खाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

या प्रकरणी याचिका कर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगीही देण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आदेशही दिले. पण न्यायालयाने आदेश देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

BJP MLA Suresh Dhas
Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे अडचणीत? भाजपने पाठिंबा दिल्याचा संभाजीराजेंच्या उमेदवाराचा दावा

आमदार धस यांच्यावर कारवाई करून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खाडे यांनी केली आहे. पण प्रशासनाकडून कोणतीही ठोस करवाई केली जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी मुंबईमधील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे शासनाचा कोणी अधिकारीदेखील देखील अद्याप त्यांच्यापर्यंत पोहचला नाही. हिंदू देवस्थानाच्या जमिनी चोरणाऱ्यांना हे सरकार संरक्षण देतेय का, असा सवालही खाडे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com