Maharashtra News Live Update: पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Marathi Breaking Live Headlines Updates : निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, सीजेपी, राज्यासह देशातील राजकीय घडामोडी वाचा एका क्लिकवर.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

तुळजाभवानी मंदिरात परिसरात हाणामारीची घटना

तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात नगरचे आणि स्थानिकांचे पुजारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. हा सर्व प्रकार बंदोबस्तावर असलेले पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या समोर घडला, मात्र सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune : मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. रात्री हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याने जेवणासाठी आलेल्या तरुणांना कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे जेवण न मिळाल्याच्या रागातून तरुणांनी हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. हॉटेलची वेळ संपल्यानंतर जेवण देण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत अधिक तपशील आणि संबंधितांवर झालेल्या कारवाईची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

साताऱ्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. अंबाबाईच्या दर्शनावरून परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघेही जिवलग मित्र आणि एकाच गावातील होते.हा अपघात कराड शहराजवळ पुणे- बंगळुरू महामार्गावर झाला.

टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणातील शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान

टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन संशयित हल्लेखोरांनी सुरुवातीला अभिनेता सलमान खानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याचे पाहून त्यांनी हा प्लॅन बदलल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर टायगर श्रॉफ जुहू येथील फुटबॉल मैदानावर नियमितपणे जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच, तेथे सुरक्षा व्यवस्था तुलनेने कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर हल्लेखोरांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन महिलांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा पुरवठा कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शस्त्र पुरवठ्याच्या संपूर्ण साखळीचा उलगडा करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com