Eknath Shinde News : राज्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा आता थेट दिल्लीत धमाका; 'आप'चा बडा नेता शिवसेनेत...

Shivsena Political News : एकनाथ शिंदे यांचं धक्कातंत्र कायम...
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यातील सत्तांतराला आता वर्ष पू्र्ण होत आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत मागील वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. या नंतर १९ पैकी १३ खासदांरांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदेंनी पक्ष बळकट करताना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्केवर धक्के देत नेते,पदाधिकारी,कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. आता शिंदेंनी इन्कमिंगचा आपला मोर्चा राष्ट्रीय पातळीवर वळवला आहे. 'आप'ला धक्का देत शिंदेंनी प्रमुख नेता गळाला लावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत शिवसेनेच्या पक्षबांधणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता शिंदेंनी दौरे, बैठका, भेटीगाठी यांना वेग आला आहे. याचाच भाग म्हणून ठाकरे गटातील राज्यभरातले अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी हे धक्कातंत्र कायम ठेवलं असून ठाकरे गटच नाही तर इतर पक्षामधून शिवसेनेत कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

Eknath Shinde News
Odisha Triple Train Accident : रेल्वे अपघातानंतर वरुण गांधींनी खासदारांना केली ही विनंती

राज्यानंतर आता राजधानी दिल्लीत पक्षाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. आप(AAP) नेते आणि माजी आमदार कर्नल देवेंद्र सहरावत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमात माजी खासदार आनंदराव अडसूळ सहभागी झाले होते. सहरावत यांच्या माध्यमातून दिल्लीतील परिवहन कर्मचाऱ्यांसाठी, ऑटो चालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांना जोडण्याचा शिवसेने(Shivsena)चा प्रयत्न असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो.

Eknath Shinde News
Sharad Pawar : संजय राऊतांचा विषय शरद पवारांनी एका वाक्यातच संपवला; म्हणाले...

लोकसभेच्या २२ जागांवर हक्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती.या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी १३ खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकाणी उमेदवार उतरवण्याच्यादृष्टीने तयारी केली जाणार असल्याचं शिंदेंनी या बैठकीत सांगितलं. लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.

‘आप’चे पुढचे टार्गेट महाराष्ट्र

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष बांधणीसाठी पक्षाकडून पाउले उचलली जात आहेत. स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यात येणार आहे. पंढरपूर येथून रविवारपासून (ता. २८ मे) सुरू झालेली स्वराज्य यात्रा ६ जून रोजी रायगडावर पोचणार आहे. आम आदमी पार्टीची (AAP) भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी या स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार असून ७८२ किलोमीटर एकूण प्रवास करणार आहे. या यात्रेदरम्यान गावोगावी सभा होणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com