Abhijit Deepke on Gen Z : 'शिवीगाळ हा गुन्हा कसा?' जेन झीच्या भाषेवर अभिजित दीपकेंचा रोखठोक सवाल! PM मोदींचे दिले उदाहरण

Abhijit Deepke Gen Z Offensive Language : भाजप आयटी सेलचे लोक महिलांना किती घाणघाण शिव्या देतात. आणि बायोमध्ये लिहितात की आम्हाला PM मोदी फाॅलो करतात, असा टोला अभिजीत दीपकेंनी लगावला.
Abhijit Deepke Gen Z Offensive Language
Abhijit Deepke Gen Z Offensive Languagesarkarnama
Published on
Updated on

Abhijit Deepke News : दिल्लीत आंदोलन करून सरकारला शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सीजेपीने भाग पाडले. सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला जेन-झीचा मोठा पाठींबा मिळाला. मात्र, या जेन-झीने वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेण्यात येत आहे. त्यावर अभिजीत दीपके यांनी 'साम टिव्ही'वर संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला.

अभिजीत म्हणाले की, 'शिवी देणे हा अपराध आहे का? शिवीवर गुन्हे दाखल केले जातील का? नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ५० कोटीची गर्लफ्रेंड, ही कोणती भाषा आहे मग.शिविगाळीला अपराध म्हणून शकत नाही.'

'चुका होत असतील तर समजवून सांगा, गुन्हेगार म्हणत लहान मुलांना त्रास दिला जातोय त्यांना हरॅस केलं जातय. 20 ते 24 वर्षाच्या मुलींवर गुन्हा दाखल करताय, संपूर्ण मशनरी लहान मुलांच्या मागे लावणे योग्य आहे का?' असा सवाल देखील त्याने उपस्थित केला आहे.

भाजप आयटी सेलचे लोक महिलांना किती घाणघाण शिव्या देतात. आणि बायोमध्ये लिहितात की आम्हाला PM मोदी फाॅलो करतात, असा टोलाही दीपकेंनी केला.

Abhijit Deepke Gen Z Offensive Language
Amol Khatal : 'भावी मुख्यमंत्र्यांना पुन्हा स्वप्न पडायला लागली'; अमोल खताळांचा थोरातांवर नाव न घेता घणाघात

दबाव गट म्हणून काम करणार...

काॅक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून पुढे सक्रीय राहणार का? याबाबत अभिजीत दीपकेने आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, न्यायपालिका, सीबीआय, ईडी, राजकीय पक्ष हे आपले काम योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे राजकीय दबाव गट म्हणून कार्यरत राहणार आहेत.

Abhijit Deepke Gen Z Offensive Language
NEET Protest Student Attack : 'नीट' आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; 'मोदींच्या राजीनाम्याची मागणी का केली?' असा प्रश्न करत मारहाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com