Abhijit Deepke : आंदोलन मोठं झालं, श्रेय कोणाचे? अभिजीत दीपकेंनी सोनम वांगचुक यांचे नाव घेत सांगितले,...

Abhijit Deepke On Sonam Wangchuk : अभिजीत दीपके म्हणाले, आपण भविष्यात नोकरी करणार नाही. आपण आपला वेळ सीजेपीला देणार आहोत. राजकीय दबाव गट म्हणून सीजेपी कार्यरत राहील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
Abhijit Deepke says Sonam Wangchuk's involvement played a key role in expanding the protest into a larger public movement.
Abhijit Deepke says Sonam Wangchuk's involvement played a key role in expanding the protest into a larger public movement.Sarkarnama
Published on
Updated on

Abhijit Deepke News : "सोनम वांगचुक सर हे खरे गांधीवादी आहेत. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून संपूर्ण देशाला जागा करण्याचे काम केले आहे. हे गांधींचे सर्वात मोठे उपोषण आहे आणि ते अजिबात कॉम्प्रोमाईज करणारे नेते नाहीत. आंदोलन मोठं झालं त्याचे श्रेय त्यांना आहे.", असे स्पष्ट मत अभिजीत दीपके यांनी मांडले.

'साम टिव्ही'वर 'सकाळ'चे समूह संपादक निलेश खरे यांनी दीपके यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये दीपकेंनी वांगचुक यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, "सोनम वांगचुक यांचे आयुष्य अत्यंत मोलाचे आहे. जर आंदोलनादरम्यान त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा त्यांचा जीव गेला, तर आपण फक्त त्यांना क्रेडीट देऊन शांत बसणार होतो का? त्यांचे जीवन देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणूनच उपोषण सोडण्याचा निर्णय योग्य ठरला असला तरी आमचा हा लढा सुरूच राहील."

पुढ बोलताना त्यांनी सांगितले, '20 जुलैला विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन सीजेपी, सोनम सरांपेक्षा मोठं झालं. हे आंदोलन या देशातील लोकांचे झालं. आम्हालाही हे हेच हवं होतं. सुरुवातीपासूनच आम्हाला हे आंदोलन सीजेपीस माझ्या पुरतं लिमीटेड असावे, असे वाटत नव्हते.'

शिवी देणे अपराध आहे का?

आंदोलनाच्या दरम्यान, जेन-झीकडून शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला. त्याबाबत दीपके यांना विचारले असता ते म्हणाले, 'शिवीवर गुन्हे दाखल केले जातील का? नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ५० कोटीची गर्लफ्रेंड, ही कोणती भाषा आहे मग.भाजप आयटी सेलचे लोक महिलांना किती घाणघाण शिव्या देतात. आणि बायोमध्ये लिहितात की आम्हाला PM मोदी फाॅलो करतात.'

Abhijit Deepke says Sonam Wangchuk's involvement played a key role in expanding the protest into a larger public movement.
Abhijeet Dipake: 'लेकानं करून दाखवलं!' CJP च्या यशानंतर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

नोकरी करणार नाही...

अभिजीत दीपके यांनी आपली भविष्यातील प्लॅन बद्दल सांगितले की, आपल्यावर काही शैक्षणिक कर्ज आहे. ते फेडण्यासाठी कंसल्टेसीची काम कारावे लागेल. मात्र आपण भविष्यात नोकरी करणार नाही. आपण आपला वेळ सीजेपीला देणार आहोत. राजकीय दबाव गट म्हणून सीजेपी कार्यरत राहील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Abhijit Deepke says Sonam Wangchuk's involvement played a key role in expanding the protest into a larger public movement.
Abhijeet Dipke : मोठी बातमी: 'पक्षात या, नाहीतर गोळ्या घालू!' भाजपकडून थेट धमकी; अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com