Abhijeet Dipke : मोठी बातमी: 'पक्षात या, नाहीतर गोळ्या घालू!' भाजपकडून थेट धमकी; अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप

Abhijit Deepke controversial statement on BJP : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी "भाजपात या, नाहीतर गोळ्या घालू" अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeSarkarnama
Published on: 
Updated on: 

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. राजकारणात दबावाचे वातावरण निर्माण केले जात असून, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर सातत्याने दबाव टाकण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच, कुटुंबीयांना देखील धमक्या दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

अभिजीत दीपके म्हणाले की, "तू भाजपात ये, नाहीतर तुला गोळ्या घालू!" अशा प्रकारच्या धमक्या मला देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर आंदोलन मागे घ्यावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही वारंवार सांगण्यात आले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण आपली भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CJP Abhijeet Dipke
Anti Paper Leak Bill : लोकसभेत विजय पण राज्यसभेत कसोटी? 'अँटी पेपर लीक' विधेयकावर मतदान; काय आहे खासदार अन् संख्याबळाचे गणित?

दीपके यांनी सांगितले की, मला भाजपमध्ये सामील होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, मी ती स्पष्टपणे नाकारली. "जर मला भाजपमध्ये जायचेच असते, तर मी आतापर्यंत कधीच गेलो असतो. पण माझा निर्णय ठाम आहे आणि मी कोणत्याही दबावाखाली पक्षात प्रवेश करणार नाही," असे त्यांनी सांगितले.

"ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेमाची भाषा आहे," असे म्हणत त्यांनी विरोध करणाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. या सर्व प्रकारामुळे त्यांच्या आई-वडिलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

CJP Abhijeet Dipke
Fake Teacher Appointment : शालार्थ घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात नवा स्फोट; बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षकाची नियुक्ती, 5 जणांवर गुन्हा

आपल्या वयाचा उल्लेख करत दीपके म्हणाले की, "माझे वय सध्या केवळ तीस वर्षे आहे. वयाच्या हिशोबाने पाहिल्यास मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नातवाच्या वयाचा किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा असेन." अशा वयाच्या तरुणाला धमक्या देणे हे दुर्दैवी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.