BJP MLA News : MPSC पेपरफुटी प्रकरणात भाजप आमदाराची बदनामी भोवली : कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची तातडीने अ‍ॅक्शन

Maheboob Shaikh faces NC News : काही वृत्तवाहिन्यांवर आमदार अभिमन्यू पवार यांचा पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सुनील गाढवे यांच्याशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

जलील पठाण

BJP-NCP News : सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आमदार अभिमन्यू पवार यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करीत त्यांच्या समर्थकांनी औसा व किल्लारी पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींवरून दोन्ही पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव अक्रमखान पठाण यांनी औसा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार औसा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे.

27 ऑगस्ट रोजी सोशल मीडिया तसेच काही वृत्तवाहिन्यांवर आमदार अभिमन्यू पवार यांचा पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सुनील गाढवे यांच्याशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. केवळ छायाचित्राच्या आधारे कोणतेही ठोस पुरावे नसताना हे आरोप करण्यात आले असून, त्यातून अभिमन्यू पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पठाण यांनी केला आहे.

दरम्यान, किल्लारी पोलिस ठाण्यात बालाजी गणपती मस्के यांनी दिलेल्या जबाबात ॲड. अशोक बेंद्रे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मस्के यांच्या म्हणण्यानुसार, 29 ऑगस्ट रोजी फेसबुकवर ॲड. बेंद्रे यांची मुलाखत त्यांनी पाहिली. त्यात एमपीएससीच्या ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सुनील गाढवे यांचा सहभाग असल्याचे आणि त्यांचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंध असल्याचे वक्तव्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अभिमन्यू पवार हे २०२२ पासून झालेल्या सर्व पेपरफुटी प्रकरणांचे 'आका' असल्याचे आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी केल्याचेही मस्के यांनी जबाबात नमूद केले आहे. या वक्तव्यांमुळे अभिमन्यू पवार यांची बदनामी झाल्याचा आरोप करीत त्यांनी ॲड. बेंद्रे यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

BJP Flag
Ashok Kharat Samata Patsanstha Fraud : भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी; भक्तांच्या नावाने 100 खाती, 60 कोटींच्या व्यवहाराचा आरोप

दोन्ही प्रकरणात एनसी

या दोन्ही तक्रारींमध्ये आमदार पवार यांचा पेपरफुटी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांवर करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे त्यांची प्रतिमा मलीन होत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. या तक्रारींच्या आधारे औसा आणि किल्लारी पोलिसांनी स्वतंत्र एनसी दाखल करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

BJP Flag
​Pune Extortion: 'रॉ' अधिकार्‍याचा आव अन् 'पोलीस मित्रा'चा डाव! ऑनलाईन खंडणी प्रकरणात थेट पुणे ते गुजरात कनेक्शन

'पेपरफुटी’ ठरणार नवा राजकीय रणसंग्राम?

पेपरफुटीच्या आरोपांमुळे आमदार पवार यांना घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आणि त्याला पोलिस तक्रारींच्या माध्यमातून समर्थकांकडून दिले जाणारे प्रत्युत्तर, यामुळे औशातील राजकारणाची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. दोन पोलिस ठाण्यांतील एनसीनंतर आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि संबंधितांकडून काय भूमिका घेतली जाते? याकडे औसा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com