Abu Azmi Controversial Statements : 'अबू आझमी यांच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर...'अल्पसंख्यांक आयोगाचा आक्रमक पवित्रा

Abu Azmi Minority Commission : दोन समाजामध्ये तिढा निर्माण करणाऱ्या आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध अल्पसंख्याक आयोगाने केला आहे. तसेच आझमी यांना नोटीस पाठवली आहे.
Abu Azmi
Abu Azmisarkarnama
Published on
Updated on

Abu Azmi News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत वारीसाठी रस्ता बंद केला जातो. पण आम्ही त्याबाबत तक्रार करत नाही. काही लोक नमाजासाठी पाच ते दहा मिनिटांसाठी रस्त्यावर येतात.तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला जातो. आझमी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडत आहे. त्यांच्या वक्तव्याच्या दखल अल्पसंख्याक आयोगाने देखील घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान अबू आझमींना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच वेळ पडली तर आझमी यांना आयोगाच्या समोर हजर राहावे लागेल, असे म्हटले आहे.

दोन समाजामध्ये तिढा निर्माण करणाऱ्या आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध अल्पसंख्याक आयोगाने केला आहे. त्यांच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली, तर जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अबू आजमी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असे प्यारे खान म्हणाले.

Abu Azmi
Fake Signature Scam: काँग्रेसच्या माजी आमदारांची बनावट स्वाक्षऱ्या करून तब्बल 30 कोटींची फसवणूक; थेट बंगला जप्तीची नोटीस

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

आबू आझमी म्हणाले, आम्ही कोणाचीही तक्रार करणार नाही. आम्ही हिंदूंबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो. पण, आज एकाही मुस्लिमाने तक्रार केली नाही की, रस्त्यावर सण का साजरे केले जातात. पण काही मशिदी भरल्या तर काही लोक नमाजासाठी पाच ते दहा मिनिटांसाठी रस्त्यावर येतात. पण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आादित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाजपठण केले तर त्या व्यक्तीचा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायन्सस रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मी आज पुण्याहून सकाळी लवकर येत होतो. त्यावेळी मला काही लोकांनी सांगितले की, पालखी जाणार आहे, त्यामुळे लवकर जावा नाही, तर रस्ता जॅम होईल. रस्ता जाम होतो आहे. पण, आम्ही कधीही त्याबाबत तक्रार केलेली नाही, असा दावा आबू आझमी यांनी केला.

Abu Azmi
MNS Target Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची जीभ घसरली; 'पाय चाटले ..फाफडा..***' , संजय राऊतांच्या आडून उद्धव ठाकरे टार्गेट?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com