MNS Target Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची जीभ घसरली; 'पाय चाटले ..फाफडा..***' , संजय राऊतांच्या आडून उद्धव ठाकरे टार्गेट?

Sandeep Deshpande Controversial Comment Uddhav Thackeray : मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे, असे संदीप देशपांडे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS VS Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत युतीच्या चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकते दिले आहेत. तर, मनसेकडून युतीबाबत जो पर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काही बोलणार नसल्याचे म्हटले होते. मात्र,राज ठाकरेंचे विश्वासू, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावर काहींना प्रशिक्षणाची गरज आहे. उथळपणाराजकारणात चालत नाही, असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले होते.

संदीप देशपांडे यांनी आज संजय राऊत यांना उत्तर देताना थेट उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टार्गेट केले आहे. त्यांनी ट्विट करत उत्तर दिले मात्र, उत्तर देताना त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. ते म्हणाले आहेत की, 'होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत,जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही.'

'मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली.', असे म्हणत संजय राऊतांना उत्तर देताना अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच संदीप देशपांडे यांनी टार्गेट केल्याची चर्चा आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Local Body Elections 2025: प्रभाग रचनेचा फायदा कोणाला? शिवसेना, राष्ट्रवादी फुटल्याने राजकीय समीकरण बदलणार

चमचेगिरी बंद करा...

मनसेसोबत युतीसंदर्भात संजय राऊत हे वक्तव्य करत असतात त्यावरून संदीप देशपांडे यांनी रविवारी एक ट्विट करत राऊतांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. ते म्हणाले होते की, ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणाते आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये .जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनसेचे सूर बदलले?

मागील दोन महिन्यांपासून मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. राज आणि उद्धव दोघांनीही युतीसाठी सकारात्मक असल्याचे म्हटले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईतील एका हाॅटेलमध्ये भेट झाली. या भेटीनंतर मनसे नेत्यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत. ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका करत आहेत. यामध्ये संदीप देशपांडे आघाडीवर दिसत आहेत.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Black Magic : स्थानिकच्या तोंडावर मिरजेत 'अघोरी कृत्य' राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनरखाली सापडल्या हिरव्या-लाल कापडाच्या पोटल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com