
Ladki Bahin Yojana Latest Update : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेल्या एका महिलेच्या खात्यातून पैसे परत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे आता ज्या बहीणी योजनेच्या निकषात बसत नाही त्यांचा लाड सरकार करणार नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ((Ladki Bahin Yojana)) पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेतून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या सहा हप्त्यांची रक्कम 1500 रूपयांप्रमाणे पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) प्राप्त तक्रारीनुसार लाडकी बहीण योजनेचे काही निकष बदलणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. त्यामध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातील पैसे काढून घेण्यास सुरुवात देखील झाली आहे.
या कारवाई अंतर्गत धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एक खैरनार नावाच्या महिलेला सरकारकडून मिळालेले 7,500 रुपये पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा करावे लागले आहेत. तर ही महिला पात्र नसतानाही तिने अर्ज केल्यामुळे आणि दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत समोर आल्यामुळे तिचे पैसे सरकारने परत घेतल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण केले नसतानाही ज्या महिलांना (Women) योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांचे पैसे सरकार माघारी घेणार असल्याचं दिसत आहे. तसंच ज्या महिला निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जात आहे.
विविध जिल्ह्यातून अपात्र महिलांनी अर्ज केल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे आता केसरी आणि पिवळे शिधा पत्रक वगळता सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी निकषात बसलेल्या लाभार्थ्यांना धक्का लागणार नाही. मात्र, निकषापलीकडे ज्या तक्रारी आल्यात त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.