
Mumbai News, 04 Jan : भाजप खासदार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाचा वापर करून मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची 45 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार वर्सोवा पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिली आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नितेश पवार, मेघना सातपुते, राकेश गावडे यांच्यासह आणखी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये (Medical Collage) माझ्या मुलीला प्रवेश मिळवून देतो असं सांगत आरोपींनी आपली 45 लाखांची फसवणूक केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
पीडित महिला खासगी रुग्णालयात (Hospital) वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करते. त्यांची 23 वर्षीय मुलीने ऑक्टोबर 2020 मध्ये नीट परीक्षेत (NEET Exam) 315 गुण मिळवले आहेत. ती सध्या बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. मार्च 2021 मध्ये मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत असताना पीडित महिलेची मेघना सातपूतेशी हिच्याशी भेट झाली.
मेघनाने या महिलेची नितेश पवार व राकेश गावडे यांच्याशी ओळख करून दिली. यावेळी या दोघांनी सिंधुदुर्गातील (Sindhudurg) एका वैद्यकीय शाळेचे विश्वस्त असल्याचं सांगितल तक्रारदार महिलेला सांगितलं. त्यानंतर तिच्या मुलीला मॅनेजमेंट कोट्यातून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचं आश्वासन दिलं. यासाठी त्यांनी तिच्याकडून 15 लाखांची मागणी केली. ते देण्यास महिलाही तयार झाली.
मात्र, त्यानंतरही तिच्या मुलीला प्रवेश मिळाला नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन आल्यामुळे आता सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी आणखी पैसे लागतील त्यांनी महिलेला सांगितलं. यावेळी त्यांनी महिलेकडे तब्बल 45 लाखांची मागणी केली. तर मुलीच्या अॅडमिशनसाठी महिलेने आरोपींना 45 लाख दिले सुद्धा.
त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये कॉलेज सुरू झालं तरीही त्यांनी महिलेला कोणतीही कागदपत्र किंवा प्रवेश पत्र दिलं नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेला संशय आला आणि तिने मेडिकल कॉलेजशी संपर्क साधला असता त्यांच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेशच मिळाला नसल्याचे समजलं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने पोलिसांत (Police) धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.