Lok Sabha Election Latest Updates : मोठी बातमी! मतदानाच्या दिवशी सुटी, सवलत न दिल्यास होणार कारवाई

Maharashtra Lok Sabha Election Updates : लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होत आहे. त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Election 2024
Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : लोकशाहीमध्ये मतदानाला मोठे महत्त्व आहे. नागरिकांना निवडणुकीत आपले मत देता यावे, यासाठी आवश्यक ती काळजी निवडणूक आयोगाच्या वतीने घेतली जात आहे. अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क (Election Voting) बजवावा, यासाठी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर केली जाते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये खासगी संस्था तसेच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भर पगारी सुटी अथवा मतदान करण्यासाठी सवलत देत नसल्याचे समोर आले आहे. (Lok Sabha Election Latest Updates)

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) अधिकाधिक नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित लोकसभेच्या जागेसाठी मतदान असेल त्या दिवशी सुटी जाहीर करावी. किंवा मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी ठराविक तासांची सवलत द्यावी, असा नियम आहे. मात्र, अनेक खासगी कंपन्या याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सोडत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) ज्या खासगी संस्था, कंपन्या याकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Election 2024
Baramati Lok Sabha Election 2024 : खडकवासल्यात 'घड्याळा'ची टिकटिक वाढेना! 'तुतारी'चा निनाद मात्र...

लोकसभा निवडणूक (latest News Maharashtra Politics) महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होत आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल दुसरा टप्पा 26 एप्रिल तिसरा टप्पा 7 मे, तर चौथा टप्पा 13 मे रोजी तर पाचव्या टप्प्याचे मतदान '20 मे'ला होत आहे. निवडणुकीमध्ये मतदार असलेले कामगार, अधिकारी तसेच कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल तर सुटीऐवजी किमान दोन तासांची सवलत देण्यात यावी, अशा सूचना शासनाने सर्व संस्था, आस्थापना यांना दिलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून हा गुन्हा आहे, असे शासनाने स्पष्ट केले आहे. (Loksabha Election Updates)

R

राज्यातील कामगार विभागाच्या अंतर्गत येणारे कारखाने दुकाने आस्थापना तसेच उद्योग आणि ऊर्जा या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांना मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व खाजगी कंपन्या, निवासी हॉटेल, माहिती तंत्रज्ञान कंपनी, सर्व दुकाने तसेच मॉल यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर दोन तास मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी या कंपनीच्या प्रशासनाने संबंधित महापालिका आयुक्‍त किंवा जिल्हाधिकारी (Political agenda 2024) यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक आहे, असे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी देणे अथवा मतदान करण्यासाठी काही तास सवलत देणे बंधनकारक आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर, संस्थांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संस्थांच्या किंवा कंपन्यांच्या बेफिकिर धोरणामुळे मतदानाचा हक्क (Election News) बजावता न आल्यास आणि त्याबाबतची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आल्यास त्याची तातडीने दखल घेत संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची तरतूद आदर्श निवडणूक आचारसंहितेमध्ये असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Edited by : Rashmi Mane

Election 2024
Lok Sabha Election 2024 : बारामतीनंतर रावेरमध्येही नणंद-भावजय मैदानात? रोहिणी खडसे म्हणाल्या...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com