Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

Actor Manoj Kumar Passes Away : मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. मात्र, चित्रपटसृष्टीच्या प्रेमापायी त्यांनी आपले नाव बदलले. त्यांचा जन्म आता पाकिस्ताना असलेल्या एबटाबाटमध्ये झाला होता.
Manoj Kumar
Manoj Kumarsarkarnama
Published on
Updated on

Manoj Kumar News : दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. ते प्रदीर्घ काळापासून आजारी होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मनोज कुमार यांना बाॅलिवूडमध्ये 'भारत कुमार' म्हणून ओळखले जात. त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना नाव 'भारत कुमार' नाव मिळाले होते.

मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. मात्र, चित्रपटसृष्टीच्या प्रेमापायी त्यांनी आपले नाव बदलले. त्यांचा जन्म आता पाकिस्ताना असलेल्या एबटाबाटमध्ये 24 जुलै 1937 मध्ये झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतामध्ये आले आणि दिल्लीमध्ये स्थायिक झाले.

मनोज कुमार हे अशोक कुमार, दिलीप कुमार यांच्या अभिनयाने प्रभावित झाले होते. याचमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर आपले हरिकिशन हे नाव बदलून मनोज कुमार असे केले.

मनोज कुमार यांना यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट सृष्टीतील कामगारीविषयी दिला जाणारा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 2015 मध्ये प्रदान करण्यात आला होता.

क्रांती हा त्यांचा सिनेमा हीट ठरला होता. तर शहीद सिनेमातील त्यांच्या भगतसिंहाच्या भूमिकेचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान लालाबहादूर शास्त्री यांनी केले होते. मनोज कुमार यांचे पूरब और पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, शहीद, पत्थर के सनम, गुमनाम, सावन की घटा हे सिनेमे हीट ठरले होते.

आणीबाणीला विरोध

मनोज कुमार यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला विरोध केला. त्यामुळे त्यांच्या सिनेमावर बंदी घालण्यात आली. त्यावेळी 'दस नंबरी' आणि 'शोर' या त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती. शोर या सिनेमाचे अभिनेते आणि निर्माते देखील मनोज कुमारच होते.

Manoj Kumar
Satish Bhosale News : 'खोक्या'ला वन विभागाच्या कोठडीत मारहाण..? वकिलाच्या दाव्यानंतर न्यायालयानं दिला 'हा' मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com