Satish Bhosale News : 'खोक्या'ला वन विभागाच्या कोठडीत मारहाण..? वकिलाच्या दाव्यानंतर न्यायालयानं दिला 'हा' मोठा निर्णय

Satish Bhosale Crime : भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले हा दोन जणांना अमानुष मारहाण करणे, वन्य प्राण्यांच्या शिकार यांसारख्या गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये आहे.
Satish Bhosale
Satish BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Beed News : भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले हा दोन जणांना अमानुष मारहाण करणे, वन्य प्राण्यांच्या शिकार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत जेलमध्ये आहे. एकीकडे खोक्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे खोक्या उर्फ सतीश भोसलेला (Satish Bhosale) वनविभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. यानंतर आता बीड जिल्हा न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे.

वन विभागाच्या कोठडीत असताना खोक्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर वनविभागाच्या कोठडीतील या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला परत एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसले याला वन विभागानं ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती त्याच्या वकिलाने दिली आहे. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलानं आरोप केला आहे. त्याचमुळे खोक्याला न्यायालयीन कोठडी द्यावी,अशी मागणी केली. न्यायालयानं (Court ) वकिलाची ही मागणी मान्य करतानात सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Satish Bhosale
MLA Sanjay Kenekar News : औरंगजेबाचे थडगे काढण्यापेक्षा 'जगावं कसं अन् मरावं कसं' हे शिकवणाऱ्या संभाजी महाराजांचे भव्य स्मारक खुलताबादेत उभारू

सतीश भोसले हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृह आवारात जेवणावर ताव मारताना दिसला होता. यावेळी त्याने कार्यकर्त्यांशी चांगल्याच गप्पा झोडल्या होत्या. जिल्हा कारागृह आवारात बाहेरचा डबा आणून खोक्याला जेवण देण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

याबरोबरच भोसलेच्या दिमतीला खंडीभर कार्यकर्ते उपस्थित असल्याचे समोर आले होते.विशेष म्हणजे जेवण झाल्यानंतर खोक्याच्या हातावर मिनरल वॉटर ओतताना एक कार्यकर्ता दिसत आहे.

Satish Bhosale
Eknath Shinde on Uddhav Thackeray : ''आंधळ्याची वरात येड्याच्या घरात'' म्हणत एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका!

खोक्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी तत्काळ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन केले होते. या व्हिडिओमुळे काँवत यांनी दोन पोलिसांवर थेट निलंबनाचीच कारवाई केल्यामुळे बीड जिल्हा पोलीस दलातील अन्य पोलिस अधिकारी यांचे धाबे दणादणे आहे. या व्हिडिओमुळे बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com