Shirur Loksabha : शिरुरमधून लोकसभेला आढळरावांना उमेदवारी मिळाली तर महेशदादांची तयारी वाया जाणार ?

Adhalrao gets Loksabha nomination from Shirur : शिवाजीराव आढळराव-पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी जोरदार चर्चा पुणे जिल्ह्यात सुरु आहे.
Shivajirao Adhalrao, Mahesh landge
Shivajirao Adhalrao, Mahesh landgeSarkarnama

Loksabha Election : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी नऊ जागांवर महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला असून त्यात पुणे जिल्ह्यातील शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघाचा समावेश आहे. तेथील महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव नुकतेच अजित पवार गटाकडून पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घडामोडीमुळे आढळराव हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी जोरदार चर्चा पुणे जिल्ह्यात सुरु झाली असून सोशल मिडियात तर ती जास्तच रंगली आहे.

Shivajirao Adhalrao, Mahesh landge
Shambhuraj Desai News : खोटं बोलणारा पोपट ; शंभूराज देसाईंनी डागली राऊतांवर तोफ

अजित पवारांनी शिरुरवर दावा ठोकल्याने २०२४ ला तेथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी (महायुतीतील अजित पवार गट विरुद्ध आघाडीतील शरद पवार गट) अशीच लढत होण्याची शक्यता वाढली आहे. कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर विद्यमान खासदार डॉ. कोल्हे यांनी शरद पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळाला असून ते पुन्हा निवडणूक तयारीला लागले आहेत. पुन्हा त्यांचे दौरे सुरु झाले असून उद्या ते खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात आहेत. शिरुर लोकसभेत अजित पवारांची मोठी ताकद असल्याने त्यांनीही आपला उमेदवार महायुतीकडून उभा करण्याची तयारी सुरु केली आहे. शिरुरमधील सहापैकी पाच आमदार हे राष्ट्रवादीचे असून त्यातील खेडचे दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवारांसोबत आहेत. हडपसरचे चेतन तुपे, शिरूरचे अशोक पवार आणि जुन्नरचे अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसून ते दोन्ही पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहत आहेत.

यासाठी लढायचेय शिरुर अजित पवार गटाला

अजित पवार गटाने शिरुरवर दावा केला असला, तरी सध्याचे खासदार डॉ. कोल्हेंविरुद्ध त्यांच्याकडे तूर्तास तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनी तेथून निवडणूक लढण्याची तयारी मोठ्या जोरात सुरु केलेले अमोल कोल्हेंचे कट्टर राजकीय शत्रू आढळराव यांचे नाव पुढे केले आहे. ते तेथे सलग तीन टर्म असल्याने मतदारसंघाची त्यांना खडानखडा माहिती आहे. खासदार नसले, तरी त्यांचा जनता दरबार दर रविवारी सुरु असून खेड आणि आंबेगावमध्ये त्यांना मदत होणार आहे. पक्षाच्या बाकीच्या तीन आमदारांनी भूमिका स्पष्ट केली नसली, तरी तेथेही आढळरावांना फायदा होईल, अशी अटकळ जमेस धरून त्यांचे नाव अजितदादांनी पुढे केल्याचे समजते. विद्यमान खासदारांचा पराभव करून तेथे आपणच दादा असल्याचे अजितदादांना दाखवून द्यायचे आहे. शरद पवारांच्या बालेकिल्यातून महायुतीचा एक खासदार निवडून आणून भाजपला पुन्हा केंद्रात सत्तेत आणून आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करून आपली ताकदही अजित पवारांना दाखवून द्यायची आहे.

पुन्हा कोल्हेंविरुद्ध आढळराव सामना होणार?

दरम्यान,आढळराव हे शिरुरला महायुतीत अजित पवार राष्ट्रवादीकडून उमेदवार राहिले, तर २०२४ ला पुन्हा तेथे २०१९ च्या लोकसभेच्या लढतीची पुनरावृत्ती तेथे होणार आहे. त्यावेळी आढळराव आणि कोल्हे यांच्यात सरळ लढत होऊन ५८ हजार मतांनी डॉ. कोल्हे निवडून आले होते. परिणामी आढळरावांचा खासदारकीचा चौकार चुकला होता. दुसरीकडे त्यांचे यावेळी फायनल झाले, तर तेथे मोठ्या तयारीत असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगेंची तयारी वाया जाणार आहे. कारण त्यांनीही शिरूरमधून लढण्याची जोरदार तयारी केली आहे.

आढळरावांना सुखद धक्का

अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सामील होईपर्यंत आढळराव यांचे नाव शिरूरमधून महायुतीचे उमेदवार म्हणून जोरात होते. त्याकरिता त्यांचे गावभेट दौरे सुरु होते. पण, अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांची धाकधूक वाढली. कारण शिरुरला राष्ट्रवादीचे खासदार असल्याने अजितदादा तेथे आपला उमेदवार देणार हे जवळपास नक्की झाले. पण, त्यांच्याकडून आपलेच नाव पुढे आल्याने आढळरावांना सुखद धक्का बसला. पण,ते आपल्या कंपनी कामानिमित्त सध्या अमेरिकेत असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. २५ तारखेनंतर भारतात आल्यानंतर परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

(Edited by Sachin Waghmare)

Shivajirao Adhalrao, Mahesh landge
Shivajirao Moghe News : माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरोधात माना समाज आक्रमक; वरोऱ्यात भरपावसात काढला मोर्चा

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com