Shambhuraj Desai News : खोटं बोलणारा पोपट ; शंभूराज देसाईंनी डागली राऊतांवर तोफ

Eknath Shinde News : महायुती २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, अशा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
Shambhuraj Desai News
Shambhuraj Desai NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane News : पूर्वी बाजारात भविष्य सांगण्यासाठी पोपटवाला ज्योतिषी बसायचा, पोपट जाऊन चिठ्ठी काढायचा आणि मग भविष्य सांगायचा. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत १०० खोट्या चिठ्ठया काढल्या. त्यामुळे संजय राऊत हे खोट बोलणारा पोपट असल्याची टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

'एनडीए' आणि भाजपत (BJP) लवकरच फूट पडणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्याचा संचार घेताना त्यांनी ही टीका केली. ठाणे जिल्ह्यातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा घेण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयात देसाई आले होते. या वेळी बोलताना लोकसभा निवडणुकीचा काय फॉर्म्यला ठरला, याची कल्पना मला नाही. मात्र, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेच असतील, असे त्यांनी सांगितेल.

Shambhuraj Desai News
Ajit Pawar Vs Sharad Pawar: अकोल्यात 'अजितपर्व' आणण्यासाठी शिलेदार लागले कामाला, ‘साहेब’ही येणार !

त्यामुळे २०२४ ची कल्याणची जागा शिंदेच लढवतील, याबाबत शिवसेना (Shivsena) व भाजपमध्ये एकमत असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवतील, असा विश्वासदेखील त्यांनी बोलून दाखविला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्याच्या जागेसाठी आग्रही असल्याबाबत विचारले असता, शिवसेना किती आणि कुठल्या लढायच्या याचा निर्णय पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून महाराष्ट्रातील ४८ जागांचे वाटप करतील.

त्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेदेखील त्यांनी या वेळी सांगितले. तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचादेखील देसाई यांनी समाचार घेतला, खैरे यांनी त्यांना २०२४ ला निवडणुकीसाठी कुठले चिन्ह मिळणार आहे याचा विचार करावा. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव दिले, धनुष्यबाणाचे चिन्ह दिले. याविरुद्ध काही लोक न्यायालयात गेले तरी ते आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे खैरे कोणते चिन्ह घेणार आहेत आणि तुमचा पक्ष तरी तुम्हाला उमेदवारी देणार आहे का, याचा विचार करावा, असा सल्लादेखील देसाई यांनी या वेळी दिला.

दरम्यान, ज्या पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर देशाची अर्थव्यवस्था नेऊन ठेवली. एवढ्या मोठ्या विकासाच्या योजना राबवल्या, सामान्य घटकाला डोळ्यांसमोर ठेवून, गेली दहा-बारा वर्षे काम केलं. जी २० च्या माध्यमातून जागतिक स्तरावर मान मिळवला. २०२४ ची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लढविण्यात येईल. या महायुतीत इतर नऊ मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करताना, एकनाथ शिंदे यांनी २०० पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील असे सांगितले होते. तेच चित्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसेल, असा विश्वासदेखील देसाई यांनी व्यक्त केला.

Edited by : Amol Jaybhaye

Shambhuraj Desai News
Akola Crime News : बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींसह सचिवाला लाच घेणं भोवलं; 'लाचलुचपत'ची मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com