Shivajirao Moghe News : माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरोधात माना समाज आक्रमक; वरोऱ्यात भरपावसात काढला मोर्चा

Chandrapur Politics : ''आपली सत्ता आली तर...''
Shivajirao Moghe
Shivajirao Moghe Sarkarnama

Chandrapur Political News : आपली सत्ता आली तर माना समाजाला अनुसूचित प्रवर्गातून हटवून टाकू, असे विधान राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने माना समाजात संतापाची लाट पसरली आहे. रविवारी माना समाजबांधवांनी भरपावसात उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला.

नागपूर येथे नुकताच आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आदिवासी माना समाजाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) व माजी आमदार नामदेव उसेंडी यांचीही उपस्थिती होती. पण त्यांनी या भाष्याचा विरोध केला नाही.

Shivajirao Moghe
Vijay Wadettiwar यांनी काढली Sambhaji Bhide यांची अक्कल | Congress | Shivpratishthan | Sarkarnama

आपली सत्ता आली तर हायर पावर कमिशन नेमण्यात येईल. या माध्यमातून अनेक जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात चुकीने समावेश करण्यात आले. या यादीत माना समाजाचाही समावेश आहे. माना समाजाला अनुसूचित प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान मोघे यांनी केले होते.(Latest Marathi News)

शिवाजीराव मोघेंचे वक्तव्य हे द्वेषभावनेतून आहे. त्यांनी संपूर्ण माना समाजाचा अपमान केला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात वरोरा येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोघे यांच्याविरोधात नारेबाजी व घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला. आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना,आदिम माना जमात मंडळ, वरोरा तालुका माना जमात विकास संस्थेच्या विविध प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

माना समाज विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. माना ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. समाजाच्या स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीत माना समाज 18 व्या क्रमांकावर आहे. सन 1955 मध्ये काका कालेलकर आयोगाने माना समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले होते व तेव्हापासूनच माना समाज अनुसूचित प्रवर्गात मोडतो.

पोलिसांत तक्रार...

शिवाजीराव मोघे( Shivajirao Moghe)यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माना समाजाने केली आहे. यासंदर्भात वरोरा पोलिस स्टेशनमध्ये रविवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजीराव मोघे यांनी वादग्रस्त विधान करून समाजात तेढ निर्माण केली आहे. यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या मोघेंवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माना समाजाचे पदाधिकारी अरुण चौधरी यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Shivajirao Moghe
Shivsena News : लोकसभा निवडणुकीसाठी घरोघर पोहोचणार शिंदे गटाचे ‘शिवदूत’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com