Mahayuti Government : CM फडणवीसांच्या परीक्षेत आदिती तटकरे- एकनाथ शिंदेंना डिस्टिंक्शन! अन्य मंत्र्यांचा अभ्यास पडला कमी ! 100 दिवसांचा निकाल जाहीर

Maharashtra Government 100-Day Report Card : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत असलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विभाग कशी कामगिरी करतो याकडे लक्ष होते. विशेष म्हणजे कृषीमंत्रालय कामगिरीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
CM Devendra Fadnavis announces Maharashtra government’s 100-day report card, with Aditi Tatkare named top performer.
CM Devendra Fadnavis announces Maharashtra government’s 100-day report card, with Aditi Tatkare named top performer.sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Report Card : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्रत्येक विभागाची ध्येय धोरणे निश्चित केली होती. 100 दिवसांत त्या विभागाने कसे कामे केले याचे मुल्यांकन करण्यात आले आहे. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे मुल्यांकन करत उत्कृष्ट कामगिरी करणारे विभागाची क्रमवारी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली.

सर्वोत्कृष्ठ काम करणाऱ्या मंत्रालयामध्ये आदिती तटकरे यांचा महिला व बालविकास विभाग अव्वल आला आहे. या मंत्रालयाला 100 पैकी 80 गुण मिळाले आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत असलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विभाग कशी कामगिरी करतो याकडे लक्ष होते. विशेष म्हणजे कृषीमंत्रालय कामगिरीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. कोकाटेंच्या विभागाला 100 पैकी 66.15 गुण मिळाले आहेत.

CM Devendra Fadnavis announces Maharashtra government’s 100-day report card, with Aditi Tatkare named top performer.
Jayant Patil Letter : 'आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करतायेत', जयंत पाटलांचे भावूक पत्र

भाजपचे दोन मंत्री गुणवत्ता यादीत

उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिला पाच जणांमध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. जयकुमार गोरे यांचा ग्रामविकास विभाग 63.85 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, पाचव्या स्थानावर नितेश राणे यांचा बंदरे विभाग आहे. यासोबत प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग देखील 61.28 गुणांसह नितेश राणेंच्या विभागासह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे.

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

कामगिरीच्या आधारावर सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांच्या क्रमवारीत 84.29 गुणांसह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पहिल्या क्रमांकावर आहेत. तर त्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर जिल्हाधिकारी जळगाव, चौथ्या स्थानावर अकोला जिल्हाधिकारी तसेच पाचव्या स्थानावर नांदेडचे जिल्हाधिकारी आहेत.

क्रमांक कार्यालयाचे नाव गुण (100 पैकी)

1. महिला व बाल विकास विभाग 80

2 सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95

3. कृषी विभाग 66.15

4. ग्राम विकास विभाग 63.85

5. पहिवहन व बंदरे विभाग 61.28

CM Devendra Fadnavis announces Maharashtra government’s 100-day report card, with Aditi Tatkare named top performer.
Caste census India : जात जनगणना अशक्य...; सुप्रीम कोर्टातील शपथपत्राचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com