Union Budget 2024 : ‘हे तर खुर्ची बचाव बजेट’; विरोधकांनी मोदी सरकारच्या वर्मावरच ठेवले बोट...

Congress, TMC MP Criticize Budget : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना घाबरून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. सरकारचे कोणतेही व्हिजन अर्थसंकल्पातून दिसून येत नाही.
Congress, TMC MP Criticize Budget
Congress, TMC MP Criticize BudgetSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 23 July : मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (ता. 23 जुलै) लोकसभेच्या नव्या सभागृहात मांडला. त्यात मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

त्यावर विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया आली असून ‘हे खुर्ची वाचवा बजेट आहे,’ असे वर्णन तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले आहे, तर काँग्रेसचे इम्रान मसूद यांनी नीतिशकुमार आणि चंद्राबाबूंना घाबरून मांडलेला अर्थसंकल्प आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय आहे, असा सवाल केला आहे. तसेच, काँग्रेसच्या मुंबईतील खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीही मिळालेली नाही, असे म्हटले आहे.

महाराष्ट्राला झुकतं माप मिळेल, अशी आशा होती. मात्र, सर्वाधिक टॅक्स देणारे मुंबई आणि महाराष्ट्राला काहीही दिलेले नाही. त्याचा काँग्रेसच्या खासदार म्हणून निषेध करते. महाराष्ट्राला काहीही न देणे ही सूडबुद्धी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.

बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष योजना देण्यात आल्या, हे चांगले आहे. मात्र, अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे? जोपर्यंत शेतकरी आणि तरुणांच्या कायमस्वरूपी रोजगाराची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत जनतेला कोणताही मोठा लाभ मिळणार नाही, असेही समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

Congress, TMC MP Criticize Budget
Union Budget 2024 : मोदींचे चंद्राबाबू अन्‌ नीतिशबाबूंना पाठिंब्याचे ‘रिटर्न गिफ्ट’; आंध्रासाठी 15 हजार कोटींचे विशेष पॅकेज!

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना घाबरून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. सरकारचे कोणतेही व्हिजन अर्थसंकल्पातून दिसून येत नाही. अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी सरकार कशा पद्धतीने करणार, हे पाहावे लागेल.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, हा खुर्ची बचाव अर्थसंकल्प आहे. एनडीएमध्ये असलेले नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत ठेवण्यासाठी हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. देशासाठी हा अर्थसंकल्प नाहीच. अर्थसंकल्पात बंगालसाठी काहीही नसून भाजपचे बंगालमधील अस्तित्व संपून जाईल, असा दावा केला आहे.

Congress, TMC MP Criticize Budget
Union Budget 2024 : निर्मला सीतारमण कुणाला कोणतं गिफ्ट देणार? या आहेत अपेक्षा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com