Santosh Deshmukh Murder Case : बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट; केज कोर्टाकडे केस वर्ग, सुनावणी होणार लाईव्ह?

Advocate Asim Sarode : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सीआयडीने दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यानंतर आता कोर्टाचे कामकाज महत्त्वाचे राहणार आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सीआयडीने दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यानंतर आता कोर्टाचे कामकाज महत्त्वाचे राहणार आहे. अशातच ही केस आता बीड कोर्टातून केज कोर्टामध्ये वर्ग करण्यात आली आहे. बीड कोर्टामध्ये दबाव विरहित ही केस चालेल का? याबाबत काही जणांनी शंका व्यक्त केलीय. त्यानंतरच केज कोर्टातमध्ये ही केस वर्ग करण्यात आली आहे. मात्र ही केस वर्ग करण्याबरोबरच या केसचं लाईव्ह स्ट्रीमिंग करावे अशीही मागणी आता समोर येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि विधिज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील केस आता बीड कोर्टातून केज कोर्टात वर्ग करण्यात आली आहे. बीड कोर्टामध्ये ही केस दबाव विरहित चालेल का? याबाबत काही लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या त्यानंतर ही केस केजला वर्ग करण्यात आली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

मात्र त्यासोबतच आणखी पारदर्शकता येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ही केस पारदर्शीपणे प्रसिद्ध होण्यासाठी त्याच लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात यावं. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक केसेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येते, त्याच धर्तीवर संतोष देशमुख यांच्या केस देखील लाईव्ह स्ट्रीमिंग व्हावं ही आमची मागणी असल्याचे असीम सरोदे म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी नवा डाव टाकला; म्हणाले, ‘हे प्रकरण वर्षात राष्ट्रपतीपर्यंत...’

कारण महाराष्ट्रातील जनतेला हे पाहायचं आहे की न्यायालयामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या कशा पद्धतीने घडत आहेत. महाराष्ट्रातील जनतेची नजर जर यावर राहिली तर ती पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचे आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case: करुणा शर्मा यांचे भाकीत खरे ठरले! धनंजय मुंडे राजीनाम्याच्या तयारीत?

काही जणांचा हे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याबाबत आक्षेप असेल मात्र महत्त्वाच्या साक्षी पुराव्या संदर्भातील भाग सोडल्यास हे प्रकरण लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाऊ शकते. महाराष्ट्रातील जनता हे पाहू शकेल आणि ती पारदर्शकता आणण्यासाठी न्यायालयाने व्यवस्था करावी ही आमची मागणी असल्याचं असीम सरोदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com